Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

समाजसेवक दिलीप अरळीकर, सौ. सुनिता अरळीकर यांचा आंतरराष्ट्रीय पालकदिनी होणार सन्मान

Date:

unnamed unnamed1
पुणे :
‘सर फाऊंडेशन’ आणि ‘डीपर’ या संस्थांच्या वतीने आंतरराष्ट्रीय पालकदिनी पुण्यात महापालक सन्मान सोहळा आयोजित केला आहे. पालकदिनाचे महत्त्व रुजविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या सोहळ्यात लातूर जिल्ह्यातील जातीभेद, निर्मूलन आणि आंतरजातीय विवाह चळवळीचे प्रणेते ज्येष्ठ समाजसेवक दिलीप अरळीकर, सौ. सुनिता अरळीकर यांचा यावर्षी सन्मान करण्यात येणार आहे.
‘सर फाऊंडेशन’तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ‘सर फाऊंडेशन’चे अध्यक्ष हरीश बुटले यांनी ही माहिती दिली.
जुलै महिन्याचा चौथा रविवार हा आंतरराष्ट्रीय पालकदिन म्हणून साजरा होतो यानिमित्ताने हा सन्मान सोहळा रविवार दि. 24 जुलै 2016 रोजी पुण्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, जे. पी. नाईक सेंटर, एकलव्य पॉलिटेक्निकच्या मागे, (कोथरूड) येथे सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे.
पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते आणि डॉ. अनिल अवचट यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. एक लाख रुपयांचा धनादेश, सन्मानपत्र, शाल-श्रीफळ असे या सन्मानाचे स्वरूप आहे. या सन्मान सोहळ्याचे हे चौथे वर्ष आहे.
आधीच्या वर्षीचे पुरस्कार विजेते पुढील वर्षीच्या पुरस्कारार्थींची निवड करतात. 2013 चे पुरस्कारार्थी डॉ. प्रकाश आमटे, व डॉ. मंदाकिनी आमटे, 2014 चे पुरस्कारार्थी डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. उर्मिला सप्तर्षी आणि 2015 चे डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ. स्मिता कोल्हे यांनी दिलीप अरळीकर व सौ. सुनीता अरळीकर दांपत्याची निवड केली आहे.
या सन्मान सोहळ्यात पालकत्त्वाला वाहिलेल्या ‘तुम्ही आम्ही पालक’ या मासिकाचा तिसरा वर्धापन दिन आणि चौथ्या वर्षाचा पहिल्या अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.
रविवार, दि. 24 रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत ‘जगा आणि जागा’ या सामाजिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भीमराव गस्ती आणि गिरीश प्रभुणे, ‘रुरल रिलेशन’चे संस्थापक प्रदीप लोखंडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन, सामाजिक विचारवंत बाबासाहेब माने या परिसंवादात सहभागी होणार आहेत. या परिसंवादाची संकल्पना आणि मांडणी हरिश बुटले यांची असून, सूत्रसंचालन के. जे. सोमय्या कॉलेजचे माजी प्राचार्य मुकूंद आंधळकर करणार आहेत.
‘डीपर’ या संस्थेची दशकपूर्ती आणि या सं स्थेच्या दहा वर्षांच्या वाटचालीत विशेष योगदान देणार्‍या समन्वयकांचा, सेवानिवृत्त शिक्षकांचा, कार्यकर्त्यांचा तसेच विशेष योगदान देणार्‍या संस्थांचा सत्कार आणि सन्मान दुपारी अडीच ते साडेचार या वेळेत करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात ‘आदर्श संस्था पालक सन्मान 2016’ हा पुरस्कार श्रीमती निलीमाताई पवार (सरचिटणीस, म. वि. प्र. नाशिक) यांना डॉ. विजय भटकर आणि महापालक डॉ. रवींद्र कोल्हे यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे.
वैद्यकीय व इंजिनिअरींगच्या सीईटीमध्ये प्रथम येणार्‍या डीपरच्या विद्यार्थ्यांचा सत्कार व गरजू विद्यर्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी साहाय्य प्रदान करण्यात येणार आहे. तसेच यावेळी स्कॉलरशिप सराव परीक्षा महाएक्झामध्ये प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. डीपर संस्थेच्या नियामक मंडळाचे  संस्थापक सचिव हरिश बुटले, अध्यक्ष प्रा. डॉ. ई. एम. खान, उपाध्यक्ष व्ही. बी. गायकवाड, सहसचिव संजय शाह, खजिनदार डॉ. व्ही. जे. गुल्हाने आणि  सदस्य संजय करमरकर, आर. एस. जाधव आहेत.
शिक्षक प्रशिक्षण, शैक्षणिक चर्चासत्र आणि कृती आराखडा व कार्यकर्ता संवाद
सोमवार, दिनांक 25 जुलै रोजी सकाळी साडेआठ ते दहा यावेळेत  शिक्षक प्रशिक्षणांतर्गत शिक्षकांची स्वप्ने आणि शिक्षणाचे भवितव्य या विषयी यजुवेंद्र महाजन, जळगाव येथील दीपस्तंभ संस्थेचे संस्थापक  मार्गदर्शन करणार आहेत. दुसर्‍या सत्रामध्ये सकाळी साडेदहा ते एकवाजेपर्यंत शैक्षणिक चर्चासत्रात ‘शिक्षणातील गुणवत्ता आणि शिक्षक’ या विषयी शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ.ल. देशमुख, श्रीमती प्रतिभाताई भराडे, प्रल्हाद काटोले, नरेंद्र लांजेवार सहभागी होणार आहेत. या चर्चासत्राची संकल्पना, मांडणी, सूत्रसंचालन भाऊसाहेब चासकर करतील, तर डॉ. श्रीराम गीत बीजभाषण करणार आहेत.
दुपारच्या सत्रात दोन ते साडेतीन या वेळेत कृती आराखडा व कार्यकर्ता संवाद यामध्ये ‘साद माणुसकीची सामाजिकता अभियान’ या विषयावर अरुण कुंभार व हरिश बुटले मार्गदर्शन करणार आहेत.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जलतरण स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलचा डंका,एकूण १० कांस्य पदके जिंकली.

पुणे, ५ डिसेंबर ः नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या...

पार्क मेदी वर्ल्ड लिमिटेडची 920 कोटी रु. ची प्राथमिक समभाग विक्री 10 डिसेंबर पासून

      प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 154  रुपये ते 162  रुपये...

पुणेकर दीपाली अमृतकर-तांदळे ठरल्या’मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’

पिंपरी-चिंचवडच्या दीपाली अमृतकर-तांदळे यांना'मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स' किताबसमृद्ध...