सिडेस्कोच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सीमा गोपुजकर यांची माहिती…
पुणे :
ब्युटीशियन्सच्या प्रमाणित प्रशिक्षणाची आंतरराष्ट्रीय मानांकन समजल्या जाणार्या ‘सिडेस्को’ या संस्थेच्या परीक्षांची ‘मेकअप सिडेस्को’ सुविधा प्रथमच पुण्यात उपलब्ध झाली.ही सुविधा ‘सीमा इन्स्टिट्युट अॅण्ड सलून’ मुंबईच्या सहकार्याने पुण्यात प्रथमच उपलब्ध करण्यात आली आहे. ‘सिडेस्को’ संस्थेच्या भारतातील जबाबदारीचा भाग म्हणून या परीक्षा पुण्यात होणार आहेत. पुणेकर युवक-युवतींना आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण त्यामुळे प्राप्त होऊ शकणार आहे, अशी माहिती तज्ज्ञ सीमा गोपुजकर (‘सीमा इन्स्टिट्युट अॅण्ड सलून’च्या संस्थापक आणि मुख्य प्रशिक्षक,व सिडेस्को प्रशिक्षण प्रमुख. मुंबई) यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी सीमा गोपुजकर ह्या ‘सीमा इन्स्टिट्युट अॅण्ड सलून’, (मुंबई)च्या संस्थापक, ‘मिडास टच’ संस्थेच्या डॉ. अंजली जोशी, मीना कांतावाला (असोसिएशनच्या विश्वस्त) उपस्थित होत्या.
या आधी ही परीक्षा संपूर्ण भारतात मुंबई येथील ‘सीमा इन्स्टिट्युट अॅण्ड सलून’ मध्ये घेण्यात आली होती. तज्ज्ञ सीमा गोपुजकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात आली. त्या गेली अनेक वर्षे सिडेस्को संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय परीक्षकाचे काम पाहात आहेत.
डॉ.अंजली जोशी या भारतातील प्रशिक्षण प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. या क्षेत्रातील प्रशिक्षणाचे प्रमाणीकरण व्हावे, आणि त्याला आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे मानांकन मिळावे यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. या प्रयत्नातून 2017 सालची 8 जणांची पहिली तुकडी ‘मेक अप’ विषयात प्रशिक्षण घेऊन भारताचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रतिनिधित्व केले.. या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय महिला आणि पुरूष यांना प्रशिक्षणाचे प्रमाणीकरण मिळविण्याची ही एक उत्तम संधी आहे, अशी माहिती यावेळी डॉ.अंजली जोशी यांनी दिली.
पुणे येथे पिम्परी चिंचवड विभागात विद्या खोत ह्या परीक्षेच्या प्रशिक्षणाचे काम बघतात…
प्रशिक्षण कोर्ससाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून मेकअप आर्टीस्ट मीरा मेवावाला, शेराली मेहता आणि दीपा भागवत यांनी काम पाहीले. तसेच मेना कांतावाला, अंजली जोशी, सबिना शेख, विद्या खोत या केशभूषा आणि मेकअप साहित्याच्या रचनाकार होत्या.
या क्षेत्रातील जनजागृतीसाठी ‘सिडेस्को’ संस्थे समवत कार्यरत अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यांचेही पुण्यात विविध उपक्रम होणार आहेत. या क्षेत्र साठी विविध परीक्षा चे आयोजन करण्यात येणार आहे. ज्या मुळे या क्षेत्राकड़े बघण्याचा दृष्टिकोण बदलेल. व शैक्षणिक दर्जा उंचावेल.. असे यावेळी सांगण्यात आले.