पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग विभगामध्ये चतुर्थ वर्षात शिकणारा सिद्धार्थ नितीन थोपटे याने केंद्रीय विद्यापीठ हिमाचल प्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी खो-खो स्पर्धेमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघातुन सहभागी झाला होता. या स्पर्धेमध्ये विद्यापीठ संघाने द्वितीय स्थान मिळविले. या यशाबद्दल संघास स्मृतिचिन्ह आणि रौप्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. सिद्धार्थ च्या यशाबद्दल संस्थेच्या सरचिटणीस मा. प्रमिला गायकवाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. सिद्धार्थ थोपटेच्या यशासाठी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. नवनाथ सरोदे यांचे वेळोवेळी प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.
सिद्धार्थ थोपटे चे खो-खो स्पर्धेत यश
Date:

