सिध्दार्थ जाधवने केली बीडच्या 85 अनाथ मुलांना मदत

Date:

महाराष्ट्राचा  एनर्जेटिक सुपरस्टार सिध्दार्थ जाधव नेहमीच आपल्या आसपासच्या लोकांच्या चेह-यावर हसू फुलवत असतो. पण ह्या मस्तीखोर आणि मनमौजी अभिनेत्यामागे एक सामाजिक भान असलेला संवेदनशील माणूसही दडलेला आहे, हे त्याने नुकतंच दाखवून दिलंय. नुकत्याच एका कार्यक्रमात सिध्दार्थने बी़डच्या सहारा अनाथालयाच्या निराधार  मुलांच्या चेह-यावरही आनंद फुलवण्यासाठी धनराशी भेट दिली आहे.
14 वर्षांपूर्वी सहारा अनाथलायाची स्थापना करून अनेक उपेक्षित, आणि वंचित मुलांना घर मिळवून देणा-या संतोष गर्जेचा त्याच्या सामाजिक कामासाठी अभिनेता सिध्दार्थ जाधवच्या हस्ते एका कार्यक्रमात नुकताच सत्कार करण्यात आला. तेव्हा संतोषने मनमोकळं करताना आपली आत्मकथा आणि निराश्रीत मुलांची व्यथा सांगताच सिध्दार्थने सर्वांसमक्ष धनराशी देण्याचे जाहीर केले.
अभिनेता सिध्दार्थ जाधव म्हणतो, “बीडच्या पाटसरा ह्या दुर्गम खेड्यातल्या गरीब उसतोडणी कामगाराच्या घरात जन्मलेल्या संतोषचा मला अभिमान आहे. वयाच्या 19 व्या वर्षापासून तो अनाथ आणि उपेक्षित मुलांसाठी  काम करतो. त्याच्या सहारा अनाथालयात 85 निराधार मुलं आहेत. ह्या मुलांसाठी मी खारीचा वाटा उचलला. इतकेच म्हणेन. जी मी धनराशी दिली, ती संतोषच्या कार्यापूढे फार छोटी होती.”
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारापूर्वी पुण्याच्या Golden King ला मागितली होती 5 कोटीची खंडणी

शेट्टी गोळीबार ;सर्व आरोपी पुण्याचे रहिवासी, कुणी विद्यार्थी, तर...

पुणे शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदर विमानतळ विकास कामांचा आढावा मुंबई, दि....

‘ओव्या आजीच्या’, ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : सुलभा रारावीकर लिखित ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ आणि...