अभिनेत्री श्वेता शिंदेचे छोट्या पडद्यावर  पुनरागमन!!

Date:

‘ अवंतिका’ , ‘अवघाची हा संसार’, ‘वादळवाट’ या गाजलेल्या मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री श्वेता शिंदे काही वर्षांपूर्वी अभिनयाकडून मालिका निर्मिती क्षेत्राकडे वळल्या. त्यांनी झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ लागीर झालं जी’ आणि सध्या सुरु असलेली ‘मिसेस मुख्यमंत्री’ ह्या मालिकांची यशस्वी रित्या निर्मिती केली. मात्र आता श्वेता यांनी आपली अभिनयाची आवड जोपासण्यासाठी लवकरच छोट्या पडद्यावर परतणार आहेत. सध्या त्या कोणत्या भूमिकेत दिसणार आहे हे जरी गुलदस्त्यात असले तरी झी युवा वाहिनीवर नवीन येणाऱ्या एका मालिकेत ही उत्कृष्ट अभिनेत्री तिची अदाकारी प्रेक्षकांना दाखवणार आहे.

श्वेता मूळच्या साताऱ्याच्या, महाविद्यालयीन शिक्षणासाठी तीत्या मुंबईत आली .  मुंबई मध्ये महाविदयालयात असतानाच त्यांच्या सौंदर्यामुळे अनेक मॉडेलिंग च्या ऑफर येऊ लागल्या. अतिशय सुंदर चेहरा आणि तिचा स्वतःवरील आत्मविश्वासामुळे, घरच्यांचा संपूर्ण सपोर्ट नसतानाही त्यांनी या ऑफर्स स्वीकारायला सुरुवात केली. त्यानंतर मात्र त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही.अनेक उत्तोमत्तम मालिका आणि चित्रपटांमध्ये त्यांनी अतिशय महत्वाच्या भूमिका केल्या आणि त्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलया. सध्या त्या मालिका निर्मितीकडे वळलया असल्यामुळे प्रचंड बिझी झालया आहेत त्यामुळे अभिनयासाठी हवा असेलला वेळ त्यांना मिळत नव्हता.  पण आता पुन्हा लवकरच त्या आणि जय मल्हार फेम देवदत्त नागे झी युवा वर नवीन येणाऱ्या एका मालिकेत एकत्र काम करताना दिसणार आहेत. सध्या त्यांचा एक फोटो सोशल मीडिया आणि व्हाट्सएपवर भरपूर वायरल होत आहे. ज्यात देवदत्त नागे त्यांचा जय मल्हार च्या लूकच्या पूर्णपणे विरुद्ध अश्या वेषात दिसत आहे आणि त्याला पोलीस पकडत आहेत तर दुसरीकडे श्वेता त्यांच्या गळ्यातील मफलर पकडून एक स्मितहास्य देत आहेत .झी युवावर नवीन येणाऱ्या या मालिकेत या दोघांची नक्की काय केमिस्ट्री असणार आहे आणि कोणती भूमिका त्या साकारणार आहे याची प्रेक्षकांना आता उत्सुकता लागून लागली आहे.

श्वेताला  भूमिकेबद्दल विचारले असता, तिने  सांगितले की “ही भूमिका, एका कॉलेजच्या डीनची आहे, एवढंच मी आत्ता सांगू शकतो. एक वेगळ्या प्रकारची लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘झी’सोबत माझं नातं खूप जुनं आहे. ‘अवंतिका’, ‘वादळवाट’, ‘अवघाची संसार’सारख्या मालिकांमध्ये मी काम केलेलं आहे. ‘लागिरं झालं जी’ मिसेस मुख्यमंत्री या मालिकेची निर्मिती सुद्धा मी केलेली आहे. मी ‘झी’मध्येच लहानाची मोठी झाले असं म्हणता येईल.  आज बऱ्याच वर्षांनंतर मी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर काम करणार आहे. याची मनात थोडीशी धाकधूक आहेच, पण ‘झी’च्याच प्लॅटफॉर्मवरून पुनरागमन करत असल्याने आनंद सुद्धा खूप झालेला आहे. या भूमिकेसाठी माझी तयारी सुरू झालेली आहे. मला वजन कमी करावं लागणार आहे. २ दिवसांपूर्वीच मी डाएट सुद्धा सुरू केलंय. खूप व्यायाम सुद्धा करावा लागणार आहे. व्हॅनिटी व्हॅनवर पुन्हा एकदा नाव बघताना खूपच छान वाटलं. मालिकेचा विषय उत्तम असल्याने काम करायला सुद्धा खूप मजा येईल. प्रेक्षकांना सुद्धा ही मालिका आणि माझी भूमिका खूप आवडेल याची मला खात्री आहे.”

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...