पुणे – पुण्याची आईटी प्रोफेशनल श्वेता शाह ने आपली पहिली कादंबरी ‘ “आई वीयर द स्माइल यू गेव’”शहरातील फिनिक्स सिटी च्या क्राॅसवर्ड मध्ये लांच केली. ही कादबंरी मैत्री, प्रेम आणि कर्तव्य यांच्या दुखांतावर आधारित आहे. ही कादबंरी पुरूष प्रधान पात्र्याच्या वास्तविक जीवनात घड़लेल्या घटनांपासून प्रेरणा घेवून रचलेली आहे. फिल्म निर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते युवराज शाह या प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्यानं उपस्थित होते. ब्ल्यू रोज पब्लिशर्स द्वारे प्रकाशित ही कादंबरी अमेजान, फ्लिमकार्ट,,शाप क्लूज,,बुक अड्डा(सपना आनलाइन),ब्ल्यू रोज पब्लिशर्स सकट भारताच्या सर्व मोठ्या आफलाइन स्टोर्स मध्ये उपलब्ध आहे.
श्वेतामध्ये लेखन प्रतिभा नैसर्गिक आहे. ती म्हणते कि लिखाण हे तिच्या जीन्स मध्ये आहे. ह्याची प्रेरणा तिला तिच्या वडिलांकडून मिळाली आहे. श्वेता सध्या लवकरच येणार्या आपल्या दुसर्या कादंबरी वर काम करते आहे. काम्युटर शास्त्राचा अभ्यास केलेली श्वेता जर्मन भाषेची तज्ञ्न पण आहे. शिवाय ती गेली 8 वर्षे आईटी क्षेत्रात काम करते आहे. या दर्म्यान तिला तिच्या प्रोजेक्ट्स साठी न केवळ भारतात पण भारताच्या बाहेर जर्मनी आणि फिलिपाइंस मध्ये देखील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे श्वेता चांगली रेकी मास्टर टीचर सुद्धा आहे.
या प्रसंगी बोलताना फिल्म निर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते युवराज म्हणाले ‘श्वेताची कादंबरी वाचणें हे तरूणपीढि साठी नक्कीच प्रेरणादायक असणार आहे. ही कादंबरी न केवळ आम्हाला प्रेम, कुटुंब आणि मैत्रीचं सौंदर्य पटवते त्या बरोबरच देशाबद्दल आदर आणि कर्तव्यभावनाचं महत्व ही शिकविते. मी या सफल पुस्तकामार्फत युवा पीढीचे मनोरंजन आणि त्यांना आपले नैतिक मूल्य शिकविण्या साठी श्वेताचे अभिनंदन करतो.
आपल्या कादंबरी बद्दल बोलतानां श्वेता म्हणाली कि माझी कादंबरी ‘आय ‘वीयर द स्माइल यू गेव “ या पुस्तकातल्या पुरूष पात्र्याच्या जीवनातील वास्तविक घटनांपासून प्रेरणाघेवून रचलेली आहे. ही तीन पात्रांमधील प्रेम आणि मैत्रीतून उद्भवलेल्या संघर्षाची कथा आहे. श्वेता पुढे म्हणाली ‘अजीत ची अदितीवर आसक्ति आणि सुमी वर त्याच्या प्रेमातून ही कथा आकार घेते. अजीत वडिलांसमोर स्वत: ल्या सिद्ध करण्यासाठी सैन्यात जातो. स्वत:च्या प्रेमाला बाजूला ठेवून तो आपला परिवार, कर्तव्य आणि देशाप्रेमाला प्राधान्य देतो. या कथेचा शेवट एका दुखांतात होतो, जेव्हां ही तिन्हीं पात्रं वर्षाभरानंतर एकत्र येतात आणि ते आपल्या प्रेमाला नेहमी साठी दुसरं रूप देतात.
ह्याच प्रसंगी ‘चैम्प रीडर्स एसोसिएशन’ के संस्थापक सागर आझाद म्हणाले ‘ आमची संस्था नवोदित लेखकांना साहित्य क्षेत्रात पुढे आणण्याचं काम जोमाने करते आहे. श्वेता आणि तिच्या पहिल्या कादंबरी चा परिचय देताना आम्हाला तेवढाच आनंद होत आहे. वाचक तिच्या चित्त वेधक कथेस आणि कल्पक लेखन शैली ला नक्कीच प्रतिसाद देतील.