Ø १०४ देशांतील विद्यापीठांमध्ये शीर्ष ३५१-४०० या टप्प्यात पटकावले स्थान; देशात एकूण दुसऱ्या क्रमांकावर; बंगळुरूतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या अगदी मागील स्थान.
Ø शूलिनी विद्यापीठ ‘सायटेशन्स’मध्ये जगात ३९ व्या क्रमांकावर.
चंडीगढ / नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर, २०२२ : संशोधन, शैक्षणिक उत्कृष्टता आणि ज्ञान हस्तांतरण यांमध्ये उल्लेखनीय अशी जागतिक मानके प्रस्थापित करण्यात इतिहास घडविणारी हिमाचल प्रदेशातील ‘शूलिनी यूनिव्हर्सिटी’ संपूर्ण भारतातील खासगी विद्यापीठांमध्ये पहिल्या क्रमांकाची ठरली आहे. प्रतिष्ठित ‘टाइम्स हायर एज्युकेशन’च्या (टीएचई) २०२३मधील जागतिक विद्यापीठ मानांकनानुसार शूलिनी विद्यापीठाला हा सन्मान मिळाला आहे. शूलिनी विद्यापीठाला एकुणात ३५१-४०० असे मानांकन मिळाले असून ‘टीएचई रॅंकिंग ऑन सायटेशन्स’मध्ये जगात ३९ वा क्रमांक मिळाला आहे. या विद्यापीठामध्ये होणाऱ्या संशोधनाची गुणवत्ता यातून सिद्ध होते.
शूलिनी विद्यापीठाची स्थापना २००९मध्ये झाली. एक नाविन्यपूर्ण, संशोधनाभिमुख विद्यापीठ म्हणून नावाजलेले हे भारतातील आघाडीच्या बहु-विद्याशाखीय विद्यापीठांपैकी एक म्हणून उदयास आले आहे. विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मानांकन संस्थांद्वारे सर्वोच्च क्रमवारीत त्याने स्थान मिळवले आहे.
जागतिक स्तरावर ३५१-४०० या टप्प्यामध्ये जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत फक्त बंगळुरू येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ हीच संस्था शूलिनी विद्यापीठाच्या पुढे आहे. बंगळुरू
येथील ‘जेएसएस अकादमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च’ ही डीम्ड युनिव्हर्सिटी केवळ या टप्प्यामध्ये शूलिनी विद्यापीठाच्या बरोबरीने आहे.
विस्तृत आणि कठोर मूल्यांकन प्रक्रियेवर आधारलेली टीएचई जागतिक विद्यापीठांची क्रमवारी ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात प्रतिष्ठित मानांकनाची मानली जाते. उच्च शिक्षणासाठी योग्य उमेदवार आणि संस्था ओळखण्यात ही क्रमवारी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आणि विद्यापीठांना मदतगार ठरते आणि एक मौल्यवान संसाधन म्हणून कार्य करते.
शूलिनी विद्यापीठ ‘टीएचई’नुसार भारतातील खासगी विद्यापीठांमध्ये पहिल्या क्रमांकाचे ठरले, ही कामगिरी राष्ट्रीय अभिमानाची बाब असल्याचे सांगून शूलिनी विद्यापीठाचे कुलपती आणि संस्थापक डॉ. पी. के. खोसला म्हणाले, “या मानांकनामुळे आम्हाला उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी जगातील सर्वोत्तम संस्थांपैकी एक म्हणून ओळखले जाईल. अध्यापन आणि संशोधनात नवीन मापदंड प्रस्थापित करण्यासाठी आमच्या प्राध्यापकांनी केलेल्या अथक प्रयत्नांचा हा परिपाक आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, अतिप्रगत संशोधन, अत्यंत सक्षम शिक्षक, उद्योग क्षेत्रामध्ये दबदबा, आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय सहयोग आणि प्लेसमेंटविषयीचा अद्वितीय विक्रम या सर्व वैशिष्ट्यांच्या आधारावर आम्ही अव्वल दर्जाच्या २०० जागतिक विद्यापीठांच्या गटात २०२६पर्यंत प्रवेश मिळविण्याचे ध्येय ठेवले आहे.”
आंतरराष्ट्रीय ख्यातीची अग्रणी संशोधनाभिमुख संस्था म्हणून शूलिनी विद्यापीठाने स्थापनेनंतरच्या अवघ्या १३ वर्षात मोठा पल्ला गाठला आहे. व्यवस्थापन, औषध विज्ञान, कृषी, मूलभूत व उपयोजित विज्ञान, संगणक विज्ञान, जनसंज्ञापन, अभियांत्रिकी व कायदा. यांसारख्या विविध शाखांमध्ये आता ते ठसा उमटवीत आहे.
या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक करताना, शूलिनी विद्यापीठाचे कुलगुरू आणि सह-संस्थापक प्रा. अतुल खोसला म्हणाले, “टीएचईच्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीत ३५१-५०० या जागतिक क्रमवारीत स्थान, भारतातील खासगी विद्यापीठांमध्ये अव्वल स्थान आणि सर्व खासगी आणि सार्वजनिक संस्थांमध्ये दुसरे सर्वोत्तम विद्यापीठ असे सन्मान आम्ही मिळवले आहेत. या
अनुषंगाने, आमच्यासोबत अभ्यास करण्यासाठी, शिकवण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी सर्वोत्तम विद्वानांना आकर्षित करून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्हाला मिळालेल्या स्थानांमुळे शैक्षणिक आणि उद्योगासह आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत भागीदारीसाठी आम्हाला नवीन संधींचे दरवाजे खुले होतील.”
या दिशेने एक निर्णायक पाऊल म्हणून, शूलिनी विद्यापीठाने दक्षिण कोरिया, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, तैवान आणि अमेरिका येथील नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी २५० हून अधिक स्वरुपाचे करार केले आहेत. उच्च दर्जाच्या जागतिक विद्यापीठांसोबतच्या या भागीदारीमुळे शूलिनीतील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना जागतिक स्तरावर आपली गुणवत्ता दाखवता येईल, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये आघाडीवर राहता येईल. उल्लेखनीय बाब अशी, की या विद्यापीठाचे ७० टक्क्यांहून अधिक संशोधन हे आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या सहकार्याने केले जाते आणि त्यातील ३८.९ टक्के प्रकाशने जगातील अव्वल १० टक्के नियतकालिकांमध्ये समाविष्ट आहेत.
टीएचई जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये शूलिनी विद्यापीठाला अव्वल स्थान मिळाले, हा एक नवीन, उत्साहवर्धक अध्याय आहे, असे संबोधून विद्यापीठाचे प्र-कुलगुरु व सह-संस्थापक विशाल आनंद म्हणाले, “आमचे कॅम्पस अतिशय नावीन्यपूर्ण आहे. येथे उत्कृष्ट कल्पनांना आकार दिला जातो आणि वेगळेपण असलेल्या विचारांना प्रेरणा दिली जाते. यामुळेच आमचे विद्यार्थी सर्वत्र उठून दिसतात. शिक्षण पुढील स्तरावर नेण्याच्या दृष्टीकोनातून आमची वाटचाल सुरू आहे. शिक्षणाच्या प्रतिमानांची परिभाषा आम्ही पुन्हा प्रस्थापित करीत आहोत, तसेच उत्कृष्टतेसाठीची उत्कट इच्छाशक्ती निर्माण करीत आहोत,”
आपल्या अनोख्या संशोधनाठी आणि शिकवण्याच्या विशेष मॉडेल्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या शूलिनी विद्यापीठामध्ये शाश्वतता आणि नूतनीकरणक्षम ऊर्जेपासून ‘बायोमॉलिक्यूल्स’ आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अॅप्लिकेशन्स’पर्यंतच्या सर्व लक्ष्यित क्षेत्रांमध्ये संशोधन केले जाते व त्यात हे विद्यापीठ अग्रगण्य म्हणून उदयास आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची शाश्वतता उद्दिष्टे
पूर्ण करण्यामध्ये विविध संस्था जे कार्य करतात, त्याचे मोजमाप ‘टीएचई इम्पॅक्ट रॅंकिंग’द्वारे केले जाते. या रॅंकिंगमध्येही शूलिनी विद्यापीठाला जगात एसडीजी सेव्हन (स्वच्छ उर्जा) यांसाठी दुसऱ्या क्रमांकाचे आणि एसडीजी (स्वच्छ पाणी) यांसाठी सहाव्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे.
‘टीएचई जागतिक विद्यापीठ रँकिंग २०२३’मधील ‘सायटेशन्स’मध्ये शूलिनी विद्यापीठाला ३९ वे स्थान मिळाले, याविषयी भाष्य करताना शूलिनी विद्यापीठाचे नवोन्मेष व तंत्रज्ञान या विभागाचे प्रमुखे आशिष खोसला म्हणाले, “संशोधन आणि नाविन्यता यांमध्ये आम्ही एक परिसंस्था विकसीत केली आहे आणि अकराशेहून अधिक पेटंट दाखल केले आहेत. भारतात हा सर्वात मोठा असा आकडा आहे. पदवीपूर्व विद्यार्थ्यांना संशोधन आणि पेटंट दाखल करण्यासाठी सक्रियपणे प्रशिक्षण देणाऱ्या व प्रोत्साहन देणाऱ्या भारतातील मोजक्या विद्यापीठांपैकी आम्ही एक आहोत. विद्यापीठाच्या अनेक मुख्य अभ्यासक्रमांमध्ये आम्ही १०० टक्के प्लेसमेंट मिळवून देतो, असा आमचा विक्रम आहे. अव्वल श्रेणीतील बहुराष्ट्रीय आणि भारतीय कंपन्यांमध्ये आमच्या तीन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाल्या आहेत.”
शूलिनी विद्यापीठाविषयी :
अग्रगण्य शिक्षणतज्ञ आणि व्यावसायिकांनी सन २००९ मध्ये स्थापन केलेले शूलिनी विद्यापीठ हे एक संशोधनाभिमुख, बहु-विद्याशाखीय विद्यापीठ आहे. या विद्यापीठाने आतापर्यंत तब्बल ११०० पेटंट दाखल केले आहेत, तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योगांमध्ये उत्तम कामगिरी आणि आघाडीच्या जागतिक विद्यापीठांसह सहयोग यांवर लक्ष केंद्रित करून मोठी प्रगती केली आहे. ‘एनआयआरएफ रँकिंग’मध्ये या विद्यापीठाने सातत्याने भारतातील अव्वल शंभर संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. येथे झालेले संशोधन हे जगातील सर्वोत्तम विद्यापीठांच्या तोडीचे असते. शाश्वतता आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा येथपासून ‘बायोमॉलिक्यूल्स’ आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजेंस अॅप्लिकेशन्स’पर्यंतच्या लक्ष्यित क्षेत्रांतील संशोधनात हे विद्यापीठ अग्रेसर आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अग्रगण्य जैवतंत्रज्ञान संस्थांचे प्रमुख केंद्र असलेले शूलिनी विद्यापीठ हे नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्राद्वारे विविध विषयांमध्ये प्रभाव निर्माण करीत आहे.

