पुरुष व महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत समिक्षा श्रॉफ हिला दुहेरी मुकुट

Date:

  • पुरुष गटात विशाल साळवी याला विजेतेपद

पुणे, 22 फेब्रुवारी : रोहित शिंदे टेनिस अकादमी यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत महिला गटात पुण्याच्या समिक्षा श्रॉफ हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, पुरुष गटात एकेरीत विशाल साळवी याने विजेतेपद पटकावले. 
स्वराज्यरक्षक संभाजी महाराज क्रीडा संकुल, कर्वेनगर येथील टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत सहाव्या मानांकित समिक्षा श्रॉफ हिने इशिता जाधवचा टायब्रेकमध्ये 4-2, 4-3(7-3)असा पराभव करून एकेरीचे विजेतेपद पटकावले. दुहेरीत अंतिम फेरीत समिक्षा श्रॉफ हिने तन्वी तावडे च्या साथीत अश्वगंधा पराडे व सई जगताप यांचा 4-2, 4-2 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद मिळवले. 16 वर्षीय समिक्षा ही 11वी इयत्तेत आरएमडी सिंहगड स्प्रिंगडेल शाळेत शिकत असून निगडी येथे प्रशिक्षक नंदू रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे हे या वर्षातील दुसरे विजेतेपद आहे. 
पुरुष गटात अंतिम फेरीत  विशाल साळवी याने अंशुल सातवचा टायब्रेकमध्ये 4-3(7-3), 4-1 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. दुहेरीत अंतिम फेरीत जय दिक्षित व आरव साने या जोडीने सुजन परब व यश संत यांचा 4-1, 4-1 असा सहज पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना प्रशस्तीपत्रक व आकर्षक पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण उद्योजक अमोल वरखडे व केदार बराटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक रोहित शिंदे, मुख्य प्रशिक्षक दत्तात्रय शिंदे, रोहन शिंदे, आदित्य टक्के, अंकुश कराळे, प्रमोद चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी गट: महिला गट: अंतिम फेरी:समिक्षा श्रॉफ(6)वि.वि.इशिता जाधव 4-2, 4-3-(7-3);

पुरुष: उपांत्य फेरी:अंशुल सातव वि.वि.ईशान देगमवार 1-4, 4-0, 4-0;
विशाल साळवी वि.वि.साहिल तांबट 4-2, 4-2;
अंतिम फेरी: विशाल साळवी वि.वि.अंशुल सातव 4-3(7-3), 4-1

दुहेरी गट: महिला: उपांत्य फेरी:
समिक्षा श्रॉफ/तन्वी तावडे वि.वि.श्रुती नांजकर/हृता सचदेवा 3-5, 4-1, 10-7;
अश्वगंधा पराडे/सई जगताप वि.वि.अंतरा मोहोळ/अवनी वानखेडे 4-1, 4-1;
अंतिम फेरी: समिक्षा श्रॉफ/तन्वी तावडे वि.वि.अश्वगंधा पराडे/सई जगताप 4-2, 4-2.

पुरुष गट: उपांत्य फेरी:जय दिक्षित/आरव साने वि.वि.काहिर वारीक/सार्थ बनसोडे 6-5(7-5), 6-1;
सुजन परब/यश संत वि.वि.व्यंकटेश आचार्य/नितीन सावंत 6-5(7-4), 6-5(7-2);
अंतिम फेरी: जय दिक्षित/आरव साने वि.वि.सुजन परब/यश संत 4-1, 4-1.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...