जिंदगी एक सुहाना सफर ,हसते रहो:हसाते रहो- श्री श्री रविशंकर (व्हिडीओ)

Date:

पुणे :जिंदगी एक सुहाना सफर है , हसते रहो:हसाते रहो, मगर फसते मत रहो और किसीको मत फसावो असा संदेश देत आज अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी मानसिक तणाव हि २०२५ पर्यंत ची जगातील सर्वाधिक मोठी समस्या असल्याच्या बाबीकडे लक्ष वेधले . आनंद देणारी स्थळे हीच खरी मंदिरे आहेत असेही ते म्हणाले .
मालपाणी समूहातर्फे निर्मित लोणावळ्यातील ‘मॅजिक माउंटन्स’ या अॅम्युझमेंट पार्कचे उद्घाटन आज श्री श्री रवीशंकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.आर्ट ऑफ लिव्हिंगच्या भानुमती नरसिंहन, ललितादेवी मालपाणी, खासदार श्रीरंग बारणे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मालपाणी समूहाचे राजेश मालपाणी, संजय मालपाणी, मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, आशिष मालपाणी, जय मालपाणी यांबरोबर मालपाणी कुटुंबियांची तिसरी पिढी जय मालपाणी, यश मालपाणी, हर्ष मालपाणी आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री श्री रवीशंकर म्हणाले की, आज जगभरात डिप्रेशन अर्थात निराशा येणे ही मोठी समस्या आहे. २०२५ पर्यत ही जागतिक समस्या होईल इतक्या वेगाने ती वाढत आहे. मॅजिक माउंटन्स या अॅम्युझमेंट पार्कमध्ये तुम्ही आलात तर या ठिकाणच्या राईड्स तुमचा तणाव काही काळात पळवून लावतील. या राईड्समध्ये बसून तुम्ही बालपण अनुभवाल, आनंदी व्हाल आणि एकदा तुमचे मन हलके झाले की नाविन्यपूर्ण गोष्टींचा शोध घेत तुम्ही निश्चित प्रगती कराल.
आपले आयुष्यही एखाद्या राईडप्रमाणेच आहे. यामध्ये संकट येतील, अवघड काळ येईल पण नेहमी लक्षात असू द्यात कि एक ईश्वर मानतो अशी शक्ती आपल्या सोबत असते ,या व्यवस्थेमुळेच आयुष्यात संकटांच्या काळात तुम्ही सुरक्षित बाहेर पडाल.
            जागतिक दर्जाच्या ३० हून अधिक राईड्स असलेले व पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारे लोणावळा येथील मॅजिक माउंटन्स हे अॅम्युझमेंट पार्क आता पर्यटकांसाठी खुले असून लोणावळ्याजवळ सुमारे ३५ एकर परिसरात ते पसरले आहे. पर्यावरणाचा विचार करून या अम्युझमेंट पार्कची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये पाण्याच्या पुर्नवापराबरोबरच सौर उर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. याठिकाणी भारतातील सर्वांत उंच झेड फोर्स आणि टर्बो राईड्सचा समावेश आहे. याबरोबरच भारतातील मोठ्या जाएंट फ्रीज्बी, सुपर फन व्हर्टिकल स्विंग, सुपर स्प्लॅश यांबरोबर इतर अनेक राईड्सचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. या सर्व राईड्स कॅनडा, जर्मनी, इटली, फिलीपाईन्स येथील झॅम्पर्ले, मोसेर, हुस आणि व्हाईट वॉटर या ब्रॅण्डच्या असून पर्यटकांच्या आवडीबरोबरच त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊनच त्यांची उभारणी करण्यात आली असल्याचे यावेळी मनीष मालपाणी यांनी सांगितले.
याबरोबरच या अॅम्युझमेंट पार्कमध्ये मल्टी क्विझिन उपहारगृहांमध्ये स्वादिष्ट जेवणाचा आस्वादही पर्यटकांना घेता येणे शक्य आहे. या ठिकाणी एक हजारांहून अधिक चार चाकी गाड्यांची पार्किंग व्यवस्था आहे. सोलर पॉवर्ड पार्किंग व्यवस्था असलेले हे भारतातील सर्वांत मोठे पार्किंग आहे अशी माहिती यावेळी राजेश मालपाणी यांनी दिली.
सदर अॅम्युझमेंट पार्कसाठी आम्ही सुमारे २५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून हे अम्युझमेंट पार्क भारतातील सर्वांत मोठे अम्युझमेंट पार्क आहे. याबरोबरच नजीकच्या भविष्यात रोलर कोस्टर,तसेच २०० खोल्यांचे एक रिसोर्ट उभारण्याचा आमचा मानस आहे. याबरोबरच तिरुपती बालाजी या ठिकाणी आध्यात्मिक संकल्पानेवर आधारित व अहमदाबाद, बंगळूरू या ठिकाणी लोणावळ्याच्या धर्तीवर अम्युझमेंट पार्क बनविण्याचा आमचा विचार असल्याचे यावेळी संजय मालपाणी यांनी नमूद केले.
मालपाणी समूहाविषयी –  मालपाणी हा देशातील एक मोठा उद्योग समूह असून पुर्ननिर्मितीक्षम उर्जा, एफएमसीजी प्रोडक्ट्स, अम्युझमेंट व वॉटर पार्क, बांधकाम क्षेत्र व हॉटेल व्यवसाय यामध्ये ते कार्यरत आहेत. शिर्डी येथील पहिले ‘वेट अॅण्ड जॉय’ पार्क, लोणावळा येथील भारतातील सर्वांत मोठे वॉटर पार्क म्हणून ओळखले जाणारे ‘वेट अॅण्ड जॉय’ पार्क आणि भारतातील पहिले आध्यात्मिक थीम पार्क म्हणून नावाजलेले शिर्डी येथील ‘साई तीर्थ’ आदी तीन मोठ्या प्रकल्पांची उभारणी मालपाणी समूहाच्या वतीने करण्यात आली आहे. 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचे फोन पण प्रशांत जगताप यांनी निवडला काँग्रेसचा मार्ग

काँग्रेसमध्येही अस्वस्थता हि भाजपाने पेरलेली बातमी भाजपाला साथ देणाऱ्यांना...

‘पुण्याच्या क्रीडा विश्वाला नवा आयाम देणार’:केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

⁠खासदार क्रीडा महोत्सवाचा पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाने समारोप पुणे (प्रतिनिधी) :...