पाणी नसलेल्या जगाची ‘तहान ‘ मांडणारा लघुपट ‘दोर सुटलेली नाव ‘ प्रदर्शित
विशीतल्या युवकांनी लघु पटाद्वारे मांडले पाण्याचे महत्व
नव्या पिढीची अभिव्यक्ती नेहमीच महत्वाची -प्रवीण तरडे
पुणे
पाणी नसलेल्या जगात पाण्याच्या जागी घाम ,अश्रू आणि रक्त शोधावे लागणार का ? असा भीषण प्रश्न व्यक्त करणारा ‘दोर सुटलेली नाव ‘ हा पाणी टंचाई बद्दल जागृती करणारा लघु पट शुक्रवारी सायंकाळी ‘व्यक्ती पुणे ‘ या संस्थेने पुणेकरांना सादर केला आणि वाहवा मिळवली
या लघुपटाचे लेखन किरण ढमाले यांचे आहे. तर दिग्दर्शन किरण ढमाले, सुयश झुंझूर्के, तेजश्री शिलेदार यांचे असून ‘व्यक्ती पुणे ’च्या लता संजय झुझुर्के या निर्मात्या आहेत.प्रमुख भूमिका सुयश झुंझुरके यांची असून प्रकाशयोजना आदित्य बिडकर आणि साहिल जाधव यांची आहे . इंद्रधनुष्य पर्यावरण आणि नागरिकत्व केंद्र (दत्तवाडी ) येथे या लघुपटाच्या पहिल्या सादरीकरणाला प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे ,चित्रपट महामंडळाचे सचिव संजय ठुबे ,आशिष केसकर ,कलाकार रमेश परदेशी उपस्थित होते .
या लघु पटाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व युवा टीम वयाच्या विशीतील आहे . पुणे परिसरात चित्रीकरण झाले असून अवघ्या ११ हजारात निर्मिती पूर्ण करण्यात आली
यावेळी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले ,’ नवी पिढी काय बोलते ,मांडते यावर चित्रपट सृष्टीपासून जगाचे लक्ष असते . त्यामुळे आपल्या अनुभूतीशी प्रामाणिक राहून युवा पिढीने व्यक्त व्हावे . धडपडीला नेहमी यश मिळते त्यामुळे प्रयोगशील राहावे ‘
संजय ठुबे म्हणाले ,’पाण्याची समस्या सर्वांच्या लक्षात आलेली आहे ,म्हणुनच पुण्यातील कलाकारांनी देखील वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच केला ‘
आशिष केसकर म्हणाले ,’ दोर सुटलेली नाव ‘ हा पाणी समस्येवरील दाहकता व्यक्त करणारा चांगला लघुपट असून कमी वयातील टीमने घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत . ‘
अंघोळीच्या वेळी पाणी वाचविण्याचे अनुभव देखील प्रवीण तरडे आणि रमेश परदेशी यांनी सांगितले
वैशाली गोस्वामी यांनी स्वागत केले . वैभव पंडव यांनी आभार मानले
व्यक्ती-पुणे ‘ ही संस्था विविध वयोगटातील कलाकारांना प्रोत्साहन देऊन नवीन आणि सामाजिक विषयावर भाष्य करणार्या नाट्य स्पर्धा ,एकांकिका स्पर्धात सहभागी होते . लघुपटांची निर्मिती करते. ‘व्यक्ती पुणे संघटने’ला महाराष्ट्रभरातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.