‘हिमाचल सध्या मुंबईच्या अनेक फिल्म यूनिट्सचा पाहुणचार करत आहे. देव भूमी प्रत्येक भारतीयाची आहे आणि जर कुणी या राज्यातून पैसे कमावत आहे तर त्याला हरामखोर किंवा नमकहराम म्हटले जाणार नाही. जर कुणी म्हणत असेल तर मी निंदा करते, बॉलिवूड प्रमाणे शांत राहणार नाही.’असा टोला आज कंगना रनोटने पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊतांना लागावला आहे .तिने आपल्या ट्विटमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या ‘भूत पुलिस’ या चित्रपटासंबंधीत न्यूज आर्टिकल शेअर केले आहे .
संजय राऊतांनी कंगनाला हरामखोर म्हटले होते
गेल्या महिन्यात कंगनाने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांवर टीका केली होती. यासोबतच संजय राऊतांवर तिला मुंबईत न येण्याची धमकी दिल्याचा आरोप लावला होता आणि मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी केली होती.कंगनाच्या ट्वीटवर भडकलेल्या संजय राऊतांनी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिला हरामखोर मुलगी असे म्हटले होते. यानंतर राऊतांवर टीका झाली तेव्हा ते स्पष्टीकरण देत म्हणाले होते की, हरामखोर म्हणजे नॉटी म्हणालो होतो.
डलहौजी येथे सुरू आहे ‘भूत पोलिस’ची शूटिंग
पवन कृपलानींच्या दिग्दर्शनात तयार होत असलेला हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूत पुलिस’ची शूटिंग सध्या हिमाचल प्रदेशच्या डलहौजीमध्ये सुरू आहे. यासाठी चित्रपटाचे अॅक्टर्स सैफ अली खान, अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडीज, यामी गौतम आणि प्रोड्यूसर्स रमेश तौरानी आणि अक्षय रायसोबत तिथे पोहोचले आहेत.

