“कोणाच्या तरी मागे मागे करा अन्…”, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतील अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

Date:

सिनेसृष्टीत काम मिळावे यासाठी अनेक कलाकार अथक धडपड करत असतात. अनेकजण लॉबीला कंटाळून किंवा कौशल्य पूर्ण पणाला लाऊन किंवा कितीही कोणाच्याही पुढे मागे करून अयशस्वी होतात आणि माघारी फिरतात ,सारी स्वप्ने , उमेद यांचा चुराडा होतो , अंगी गुण असूनही योग्य संधी मिळत नाही म्हण्यापेक्षा दिली जात नाही , आणि अयोग्य व्यक्तींना मात्र संधी देऊन देऊन डेव्हलप केलं जातं , अनेकदा या कलाकारांना कास्टिंग काऊचसारख्या प्रकाराचाही सामना करावा लागतो. सिनेसृष्टी मग ती बॉलिवूडअसो वा हॉलिवूड वा कोणत्याही प्रांतातील असो यातील अनेक अभिनेत्रींनी आतापर्यंत पुढे येऊन कास्टिंग काऊचबद्दल उघडपणे वक्तव्यंं केली आहेत. नुकतंच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने याबाबत भाष्य केले आहे.

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मीनल बाळ हे तिचे नाव . तिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच भेटली तू पुन्हा, इरादा पक्का यासारख्या चित्रपटातही ती झळकली. तसेच स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतही तिने ‘लाडी’ ही भूमिका साकारली होती. नुकतंच मीनलने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहेतिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

कौआ मोती खायेगा – तिने म्हटले आहे पोस्टमध्ये ते वाचा –

“प्रामाणिकपणे खूप मनापासून सिरियसली काम करणं, विचार करून चांगलं काम करण्याची धडपड, संयम, श्रध्दा, मेहनतीचं फळ वगैरे सब झूट है!!! कोणाच्या तरी मागे मागे करा, करेक्ट लोकांच्या संपर्कात रहा, एखाद्या ग्रूपशी संलग्न रहा, खूप गोड (खोटं खोटं) वागा आणि बास झालं काम.

मग काय कामावर काम मिळत राहणार आणि मग वर वर काम केलं तरीही किंवा काम येत नसेल तरीही फरक पडणार नाही. तुमच्या डोक्यावर क्राऊन हा असणारच आणि मग त्याचाच रुबाब (attitude) करायचा आहे की नाही वर जाण्याचा म्हणजे प्रसिद्ध होण्याचा मार्ग. शू…..कोणाला सांगू नका हा , हा मार्ग मी तुम्हाला सांगितला ते… आपलं सिक्रेट.

रामचंद्र कह गए सिया से, ऐसा कलयुग आएगा, हंस चुगेगा दाना तुन का, कौआ मोती खाएगा. ता. क.- वरील मजकूर हा कोणालाही म्हणजे कोणालाही उद्देशून नाही किंवा सर्वांनाच लागू होत नाही किंवा मला आक्षेप नाही, अशी पोस्ट मीनलने शेअर केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला...

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...