पुणे: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या पहिल्या वहिल्या त्रिमितीय स्टिरिओस्कोपीक ऐतिहासिक चित्र चरित्र पुस्तकामुळे छत्रपती असणार्या शिवाजी महाराज व संभाजी महराजांचा सन्मान देशभरात पोहोचेल, असा विश्वास शिवशंभूंच्या कार्याचा गौरव करणारे सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव भिडे गुरुजी यांनी व्यक्त केला. त्यांच्या हस्ते या आगळ्या वेगळ्या पुस्तकाचे प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिरात पुणेकरांच्या उपस्तितीत संपन्न झाले.
सृजन कॉलेज ऑफ डिझाईनच्या वतीने ‘शिवतेज संभाजी’वरील प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष पुरातत्व व मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. ब. देगलूरकर होते. संभाजीराजांचे चरित्रकार डॉ. सदाशिव शिवदे, इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे, पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत, पुस्तकाचे प्रकाशक व माजी उपमहापौर सुरेश नाशिककर, पुणे मनपा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेश लडकत आणि दुर्ग संवर्धन समितीचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. या चित्र चरित्रात एकेदर संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ५४ त्रिमितीय चित्रे व शंभूराजांवरील १२ कविता आहेत. पुस्तक पाहाण्यासाठी थ‘ीडी चष्माही पुस्तकासोबत देण्यात आला आहे.
आपल्या ओघवत्या शैलीत संभाजी महाराजांची महती वर्णन करातान भिडे गुरुजींनी सांगितले की सिंहाचा छावा असणाार्या संभाजी महाराजांनी देशातील शत्रूबीज कसे नाहीसे करावे व राष्ट्रप्रेम कसे वाढवावे असा मंत्रच दिला. त्यांचे प्रेरणादायी चरित्र ‘शिवतेज संभाजी’चे लेखक-संपादक संतोष रासकर यांनी राष्ट्रप्रेमातूनच वाचकांपुढे आणले आहे.
संभाजी महाराजांचे कार्यही शिवाजी महाराजांइतकेच मोलाचे असून त्याची पुनरावृत्ती इतिहासात दुसर्या बाजीरावाच्या पराक‘मात दिसून येते, असे डॉ. देगलूरकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, शिवाजी महाराजांनी धर्मासाठी जगावे कसे हे शिकवले तर संभाजी महाराजांनी धर्मासाठी कसे मरावे हे दाखवून दिले. त्यामुळे ‘शिवतेज संभाजी’मुळे संभाजी महाराजांच्या जीवनातून तरुण पिढीस नक्कीच प्रेरणा मिळेल.
महाराष्ट्र धर्म शिवाजी महाराजांनी निर्माण केला तर पुढे संभाजी महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत तो सांभाळला, असे गौरवोद्गार डॉ. शिवदे यांनी काढले. यमयातना सोसून संभाजी महाराजांनी राष्ट्रवाद जोपासला व त्यांचे अलौकिक मोल आजच्या पिढ्यांपर्यंत पोचवण्याचे काम ‘शिवतेज संभाजी’द्वारे रासकर यांनी चांगल्या पद्धतीने केले आहे.
या चित्र चरित्राने मराठी माणसापुढे राष्ट्रप्रेरणा देणारा नवा आदर्श उभा केला असल्याचे सांगून बलकवडे म्हणाले की, परकीय तसेच स्वकीय शत्रूंशी यशस्वी लढून संभाजी राजांनी छत्रपतींचा वारसा पुढे नेताना मुघल सम‘ाट औरंगजेबाला नमविले हेही मोठेच कार्य आहे. हा लढाऊ बाणा व एकनिष्ठतेचा आदर्श आजच्या पिढीला ‘शिवतेज संभाजी’तून मिळाल्याशिवाय राहाणार नाही.
संभाजी राजांवरील ध्येयमंत्राने या कार्यक‘माची सांगता झाले. माणिक सोनवळकर यांनी प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.