पुणे- ‘सृजन कॉलेज ऑफ डिझाईन’च्या वतीने ‘शिवतेज संभाजी’ या जगातील पहिल्या त्रिमिती स्टिरीओस्कोपिक ऐतिहासिक चित्रचरित्र पुस्तकाचे प्रकाशन संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात येत्या शुक्रवारी (ता. १३ मे) सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात येणार आहे. पुरातत्वज्ञ गो. ब. देगलूरकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी बलिदान केले. त्यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग कॉम्प्युटर ग्राफिक्सचे तंत्रज्ञान वापरून त्रिमिती स्टिरीओस्कोपिक स्वरूपात सादर केले असल्याची माहिती पुस्तकाचे लेखक संतोष रासकर यांनी दिली.
८८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, पालकमंत्री गिरीश बापट, माजी खासदार प्रदीप रावत, दुर्ग संवर्धन समितीचे अध्यक्ष पांडुरंग बलकवडे, महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव शिवदे, विश्व संवाद केंद्राचे प्रदेश उपाध्यक्ष अभय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.