पुणे – राममंदिर व्हावे यासाठी शिवसेनेने ‘चलो अयोध्या’चा नारा दिला. यासाठी विविध मार्गाने प्रसिध्दी केली जात आहे. त्याच पाश्वभूमिवर आज पुणे शहरात शिवसैनिकांकडून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाऊन राममंदिरसाठी महाआरती करणार आहेत
येरवडा परिसरातून या रॅलीची सुरवात करण्यात आली. पुणे शहर शिवसेनेच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो शिवसैनिक दुचाकी घेऊन रॅलीत सहभागी झाले. शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. एकंदरीत पाहता भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने घोषित केलेल्या ‘चलो अयोध्या’ मोहिमे ला यशस्वी करण्यासाठी राज्यभरात शिवसैनिक कामाला लागल्याचे चित्र आहे
महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक अयोध्येला नेऊन शक्ती प्रदर्शनाचा शिवसेनेचा अजेंडा आहे. त्यामुळे पुणे शहरातूनही मोठ्या संख्येने शिवसैनिक अयोध्येला रवाना करण्याचे शहर शिवसेनेचे प्रयत्न आहेत. पुण्यातल्या या बाईक रॅलीमध्ये सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, माजी आमदार तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
चलो अयोध्या मोहिमेसाठी पुण्यात मोटारसायकल रॅली
Date:

