शिवसेनेतही शहराध्यक्ष बदलाचे वारे …

Date:

पुणे(शरद लोणकर )-लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर झालेले राजकीय बदल आणि तत्पूर्वी झालेल्या शहर पातळीवरील शहराध्याक्षांच्या कामकाजाच्या पद्धती पाहता आता पुण्याच्या शिवसेनेला नव्या टायगर ची आवश्यक्यता भासू लागली आहे. महापालीकेबाहेरील किंवा नगरसेवक नसलेला शहर प्रमुख देण्या ऐवजी नगरसेवकातलाच आक्रमक , आणि संपूर्ण शहर ढवळून काढेल असा एकटा टायगर कोण असेल त्यास शहरप्रमुख पद आता देणे भाग पडणार आहे. या दृष्टीने हडपसर चे नाना भानगिरे आणि कसब्यात ले  विशाल धनवडे या दोन नगरसेवकांची नावे पुढे येत असल्याचे वृत्त असून माजी खासदार असलेले शिवाजीराव आढळराव पाटील ,नीलम ताई गोऱ्हे यांच्याशी विचारविनिमय करून खासदार संजय राऊत आणि स्वतः मुख्यमंत्री असलेले सेनाप्रमुख उद्धवठाकरे  हे पुण्याचा टायगर निवडण्यात जातीने लक्ष घालतील असे दिसते आहे.
आजपर्यंत भाजपच्या नेत्यांच्या सल्ल्याने शहरप्रमुख निवडले गेले कि काय अशी शंका वाटावी अशी स्थिती होती त्याला आजपर्यंतच्या शहर प्रमुखांचा कारभार देखील जबाबदार होता .नावाला पदे घेऊन मिरवायचे आणि सत्ताधारी भाजपच्या गोटात हि रम रम रमायचे हि पॉलीसी आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खपवून घेतली जाईल असे वाटत नाही . नाना भानगिरे हे महापालिका सभागृहातील आणि आवारातील आक्रमक आंदोलक म्हणून ओळखले जातात .सर्व सामन्यांच्या प्रश्नाची तड लागत नाही तोवर त्यांना आंदोलनापासून कोणी रोखू शकत नाही असे चित्र आजवर दिसले आहे. पालिकेतील तत्कालीन गटनेत्यांनी  मात्र वारंवार आपल्या पदाचा वापर करून अशा टायगर्स ना दूर ठेवण्याचे कारस्थान अवलंबले पण आता ते नेते देखील दूर झालेत .निवडणुकीच्या राजकीय इतिहासात सेनेचे आस्तित्व दाखविण्यासाठी प्रसंगी बंड करण्याचे धारिष्ट्य विशाल धनवडे यांनी दाखविले आहे. त्यांचा हेतू सेनेचा झेंडा घुमतो आहे हे दाखविण्याचा असल्याने त्याच्या या बंडाला दंड थोपटून आव्हान देण्याची कृती मानली जाते आहे.
विद्यमान शहरप्रमुख काहीही अस्तित्व अगर स्वतःला मिळालेल्या संधीचा वापर करू शकलेले नाहीत हे अगदी स्पष्ट झाले आहे. अगदी रस्त्यात कोणाही तरुणाला किंवा वृद्धाला किंवा कोणालाही विचारले पुण्याच्या सेना शहरप्रमुख कोण ? तर किमान ९० टक्के लोकांना नाव सांगता येणार नाही असा त्यांचा वावर राहिला आहे.  त्यामुळे आगामी काळात सेनेला पुण्यात आपले भक्कम अस्तित्व आणि वजन निर्माण करायचे असेलतर शहर प्रमुख बदलण्या शिवाय गत्यंतर उरलेले नाही आणि त्या दृष्टीनेच आता सेनेचा ‘एकटा टायगर ‘ कोण असेल जो पुण्यातला मरगळलेला प्रत्येक  सैनिक जागा करून मुसंडी मारेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...