पुणे :
वारजे येथे ‘मोफत आरोग्यविषयक सल्ला केंद्र’ आणि ‘मोफत कायदेविषयक सल्ला केंद्रा’चे उद्घाटन खडकवासला विधानसभा मतदार संघाचे निरीक्षक, शिवसेना नेते राम कदम यांच्या हस्ते शिवसेना जनसंपर्क कार्यालय, वारजे माळवाडी येथे करण्यात आले.
वारजे शिवसेना जनसंपर्क कार्यालयात दर महिन्याच्या 15 आणि 30 तारीख या दोन दिवशी डॉक्टर आणि वकील यांची टीम दुपारी 3 ते 5 या वेळात बसणार असून, गोरगरीब गरजू लोकांना मोफत आरोग्यविषयक सल्ला आणि मोफत कायदेविषयक सल्ला देण्याचे काम ही टीम करणार आहे, अशी माहिती या उपक्रमाचे संयोजक आणि पुणे पालिकेचे स्वीकृत सदस्य सचिन दांगट यांनी यावेळी दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या सल्ला केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
म्हाडा कॉलनी वारजे येथील अनेक गरजू रूग्णांनी या मोफत योजनेचा लाभ घेतला. याप्रसंगी विलास भुजबळ, नगरसेविका कल्पना थोरवे, दीपक शेडे, डॉ. हेमांगी पाटसकर, डॉ. श्वेता जैस्वाल, अॅड. रणजित दरवडे, भावना थोरात, संदीप मोरे, निलकंठ शेळके, विजय गांगर्डे, शैलेश गुरव, अमजद अन्सारी, स्वानंद यादव, समीर वांजळे आदी प्रमुख पदाधिकारी आणि अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

