पुणे- महापालिकेची निवडणूक शिवसेना पक्ष प्रमुखाच्या आदेशानुसार स्वबळावर लढणार असून या निवडणुकीची उमेदवाराची पहिली यादी सोमवारी जाहीर होईल, अशी घोषणा शिवसेना पुणे शहर प्रमुख विनायक निम्हण यांनी केली.त्याच बरोबर पुण्यात भाजपचे आहेच काय ? शिवसेनेमुळे भाजप महाराष्ट्रात उभा राहिला आहे . भाजप आमच्यापुढे काहीच नाही , पुण्यात आमची लढत राष्ट्रवादीशी होईल असा दावा देखील आज निम्हण यांनी केला .
आगामी महापालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढण्याचा नारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईमध्ये झालेल्या मेळाव्यात दिल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून राज्यातील विविध ठिकाणी फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा केला जात आहे. पुण्यात देखील डेक्कन परिसरात शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर शहर प्रमुख विनायक निम्हण, माजी आमदार महादेव बाबर आणि महापालिकेतील गटनेते अशोक हरणावळ यांच्या सह कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला. यावेळी जोरदार घोषणा बाजी देखील करण्यात आली.
भाजपचे आहे काय इथे? पुण्यात शिवसेनेची लढत राष्ट्रवादीशी – विनायक निम्हण(व्हिडीओ)
यावेळी विनायक निम्हण म्हणाले की, शिवसेनेने ज्या भाजपला बोट धरून चालायला शिकवले. त्यांना सत्तेची मस्ती आल्याचे दिसून येत आहे. ही त्यांची मस्ती जनता नक्कीच आगामी महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून दाखवेल. पुणे महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकविल्या शिवाय राहणार नाही, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला… पहा निम्हण यावेळी आणखी काय म्हणाले …