पुणे-शिवसमर्थ प्रतिष्ठान आयोजित ‘स्वर प्रभात’ कार्यक्रमास पुण्यातील रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध गायक आनंद भाटे, सौ.मंजुषा पाटील यांच्या बहारदार गायनाने कार्यक्रमास रंगत आली. श्री.राहूल सोलापूरकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. नाट्यगीते, भक्तिगीते, सेमी क्लासिकल गाण्यांचे सादरीकरण यावेळेस करण्यात आले . ‘भजन मेडले’ असे अनोखे सादरीकरण यावेळेस आनंद भाटे आणि मंजुषा पाटील यांनी केले. शिवसमर्थ च्या कार्यक्रमाचे यंदाचे 5वे वर्ष होते . आयोजक,नगरसेविका सौ .मंजुषा नागपुरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . हिंगणे खुर्द सिंहगड रोड येथे सकाळी 6 वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली