शिवराज राक्षे यंदाचा महाराष्ट्र केसरी

Date:

पुणे-शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम सामना झाला. त्यात शिवराज राक्षेने अवघ्या काही सेकंदात महेंद्र गायकवाडला चितपट करत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला व मानाची गदा जिंकली.

गत 4 दिवसांपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील भल्या भल्या पैलवानांना पराभवाचे पाणी पाजत महेंद्र गायकवाड व शिवराज राक्षे किताबी लढतीसाठी एकमेकांपुढे उभे ठाकले होते. अंतिम किताबी लढत कशी होणार? दोन्ही तुल्यबळ प्रतिस्पर्धी मल्ल एकमेकांना कसे झुंज देणार? आणि कोण होणार नवा महाराष्ट्र केसरी? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. अखेर शनिवारी सायंकाळी लाखो कुस्ती शौकिनांना या प्रश्नांची उत्तरे मिळाली.

तत्पूर्वी, माती विभागात झालेल्या लढतीत महेंद्र गायकवाडने सोलापूरच्या सिकंदर शेखला धूळ चारली. तर शिवराजने अहमदनगरच्या हर्षवर्धन सदगीर याला अस्मान दाखवले.

कुस्तीपटूंच्या मानधनात वाढ

राज्यातील कुस्तीपटूंना देण्यात येणाऱ्या मानधनात तिपटीहून अधिक वाढ करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना होण्यापूर्वी देवेंद्र फडणीसांनी ही महत्त्वाची घोषणा केली. फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील जे खेळाडू ऑलिम्पिक किंवा जागतिक कुस्ती स्पर्धेत खेळले आहेत, त्यांना आतापर्यंत केवळ 6 हजार रुपये मासिक मानधन दिले जात होते. आता यात वाढ करुन 20 हजार रुपये दिले जातील. याशिवाय हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तुमे हिंद स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंचे मानधन 4 हजार रुपयांवरुन 15 हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच, अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडूंचे मानधन 6 हजार रुपयांवरुन 20 हजार रुपये करण्यात आले आहे.

तिपटीहून अधिक वाढ

याशिवाय वयोवृद्ध खेळाडूंना आतापर्यंत केवळ अडीच हजार रुपये दिले जात होते. त्यांना आता महाराष्ट्र सरकारतर्फे साडेसात हजार रुपये दिले जातील. कुस्तीपटूंचे मानधन तिपटीपेक्षा अधिक वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी घोषणा महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आतापर्यंत अत्यंत तुटपूंजे मानधन

निर्णयाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कुस्तीपटू प्रचंड मेहनत घेत असतात. त्याचप्रमाणे त्यांना खुराकही आवश्यक असतो. सामान्य घरांमधून तरुण मेहनतीने कुस्तीपटू होतात. आतापर्यंत त्यांना अतिशय तुटपूंजे मानधन दिले जात होते. त्यात त्यांचा खर्च भागणे शक्यच नव्हते. त्यामुळेच सरकारने कुस्तीपटूंच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कुस्तीपटूंना कोणतीही अडचण येऊ नये, त्यांना विविध स्पर्धांसाठी प्रोत्साहन देणे, हे यापुढे सरकारचे धोरण असेल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नोकरीत संधी दिली जाईल

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आतापर्यंत राज्य सरकारने तीन खेळाडू्ंना डीवायएसपीची नौकरी दिली आहे. अशाच प्रकारे कुस्तीत प्रावीण्य दाखवणाऱ्या खेळाडू्ंना नोकरीत संधी दिली जाईल.

महाराष्ट्र मिशन ऑलिम्पिक सुरू करणार

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, खाशाबा जाधव यांनी कुस्तीत देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. त्यानंतर मात्र महाराष्ट्रातून असे खेळाडू तयार झाले नाहीत. अशा ताकदीच्या मल्लांना घडवण्यात महाराष्ट्र मागे पडला. मात्र, आता महाराष्ट्र सरकार मिशन ऑलिम्पिक सुरू करेल. कुस्तीपटूंना प्रोत्साहन व आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जातील. त्यामुळे पुढील ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील खेळाडू नक्कीच देशासाठी पदक जिंकतील, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

आम्हीदेखील कुस्ती करतो

आम्हीदेखील राजकारणात कुस्ती करतो, असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुस्ती स्पर्धा मॅटवर, मातीवर होतात. मात्र, आम्हीदेखील राजकारणात कुस्ती करतो. आमच्या कुस्ती या टीव्हीच्या स्क्रीनवर होतात. त्यातूनच कुणीतरी राजकारणातला केसरी बनतो.

महिलांसाठीही कुस्ती स्पर्धा भरवणार

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी प्रेक्षकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. याचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजच्या कुस्ती स्पर्धेत प्रेक्षकांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रेक्षक देशी खेळांचा मान वाढवत आहे. त्यामुळे पुढे महिलांसाठीही कुस्ती स्पर्धा भरवली जाईल.

गादीत शिवराज राक्षे

गादी विभागात शिवराज राक्षेने हर्षवर्धन सदगीरला अस्मान दाखवले. हे दोघेही काकासाहेब पवार आंतराष्ट्रीय कुस्ती संकुल या एकाच तालमीतील पैलवान आहेत. हर्षवर्धन सदगीरवर शिवराज राक्षेनं 8-1 असा एकतर्फी विजय मिळवला.

मातीत महेंद्रची बाजी

माती विभागात महेंद्र गायकवाड व सिकंदर शेख यांच्यात सामना झाला. त्यात 3 मिनिटांच्या पहिल्या फेरीत दोन्ही पैलवानांनी आक्रमक खेळी केली. यावेळी पंचांनी त्यांना कुस्ती करून गुण मिळवण्याची वॉर्निंग दिली. त्यानंतर महेंद्र गायकवाडला 1, तर सिकंदर शेखला पहिल्या फेरीत 2 गुण मिळाले. त्यानंतर महेंद्रने चमकदार कामगिरी करत सिकंदरवर 5 विरुद्ध 4 अशा मतफरकाने विजय मिळवला.

एकाच गुरुचे चेले

शिवराज राक्षे हा राजगुरूनगरच्या राक्षेवाडी (जि. पुणे) येथील आहे. तो वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडे कात्रजच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सराव करतो. महेंद्र गायकवाड हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातल्या शिरसीचा (जि. सोलापूर) आहे. हा पठ्ठ्याही वस्ताद काका पवार आणि गोविंद पवारांचा शिष्य आहे. तो सुद्धा कात्रजच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सराव करतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...