पुणे : कोरोना संकंटाशी लढा देताना लसीकरण हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे, त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणावर लसीकरण व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये जगभरातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आलेली आहे. लसीकरण मोहीम जलद गतीने पार पडत असून आत्तापर्यंत संपूर्ण देशात २५ कोटीहून अधिक नागरिकांचे लसीकरण करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे. शिवाजीनगर मतदार संघामधील नागरिक सुद्धा या मोफत लसीकरण मोहिमेपासून वंचित राहू नये या हेतूने मी व मतदारसंघातील भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व टीम म्हणून काम करत आहोत असे आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी सांगितले.
झीप डेवीस कंपनीच्या माध्यमातून शिवाजीनगर मतदार संघातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात आले. यावेळी बोलताना शिरोळे म्हणाले,सर्व नागरिकांना विनंती करतो की लसीकरणाबाबत पसरवले जाणारे भ्रम व अफवांकडे लक्ष न देता आपली वेळ येईल तेव्हा लस नक्की घेऊन देशाला कोरोनामुक्तीकडे नेण्यासाठी आपले योगदान द्या.
आपण सर्वजण एकत्र होऊन कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहोत. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला भारत देश लवकरच कोरोनामुक्त होईल अशी मला खात्री आहे

