मुंबई- सत्तातंरानंतर आज झालेल्या पहिल्याच विधानसभा अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान झालेल्या नरहरी झिरवळ आणि त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे प्रतोद यांची वेगवेगळी नावे उच्चारत दोघांच्या ताक्रेंची नोंद घेत असल्याचे नमूद केल्याने,मुख्यमंत्री शिंदे आणि अन्य बंडखोर आमदारांनी बंडखोरी केल्याचे आणि शिवसेना ठाकरेंपासूनच हिसकावून घेण्याचा असे दोन विभिन्न प्रयत्न स्पष्ट झाले आहेत .
प्रथम विधानसभेचे कामकाज नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झाले तेव्हा त्यांनी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या तक्रारीची घेऊन शिवसेनेच्या सदस्यांनी पक्षाच्या आदेशाविरुद्ध मतदान केल्याचे आपल्या निदर्शनास आल्याचे स्पष्ट केले. तसेच याबाबत कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी या पत्राची दाखल घ्यावी अशी सूचना केल्यावर झिरवाळ यांनी हे पत्र वाचून दाखविले व नावासह व्हिडीओ ची नोंद असल्याचे नमूद केले . सुनील प्रभू यांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्याचा व्हीप जारी केला होता त्याविरोधात मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सहकारी बंडखोर आमदारांनी मतदान केले. तर नार्वेकर अध्यक्षपदी निवडून आल्यावर आणि ते विराजमान झाल्यावर सुनील प्रभू यांनी आपल्या भाषणात याबाबत उल्लेख केला आणि आपण या पदावर किती दिवस राहाला याबाबत शंका असल्याचे सांगूनच त्यांचे अभिनंदन केले . अभिनंदनाची भाषणे झाल्यावर नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे प्रतोद भारत गोगावले असा उल्लेख करत त्यांनी तक्रार दिली असून शिवसेनेच्या १६ आमदारांनी पक्षाच्या आदेशाविरोधात (ज्यात आदित्य ठाकरे यांचाही उल्लेख असू शकतो ) मतदान केल्याची नोंद घेतली आहे असे नमूद केले. विशेष म्हणजे नरहरी झिरवळ यांनी शिवसेना प्रतोद म्हणून सुनील प्रभूंची तक्रार नोंद करून घेतली तेव्हा राहुल नार्वेकर उपस्थित होते.प्रभूंनी अभिनंदनाचे भाषण केलेले, ज्यात त्यांनी पक्षादेशाचा उल्लेख केला ते नार्वेकरांनी ऐकले . तरीही त्यांनी त्यानंतर शिवसेना प्रतोद म्हणून भरत गोगावले असा उल्लेख करत त्यांची तक्रार वाचली अन स्वीकारून नोंद केली.
दोन प्रतोद ,दोन अध्यक्षांच्या दोन भूमिका , दोन पक्षादेश आणिदोन गट यामुळे शिवसेना निव्वळ दुभांगलीच नाही तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हि आमचीच शिवसेना असा दावा यातून भरत गोगावले यांनी शिंदे गटाचे प्रतोद म्हणून केलेला असल्याचे दिसून आले आहे.

