दादरा नगर हवेलीत लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी मोठ्या मताधिक्क्यानं विजय मिळवला आहे. कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेरच्या पहिल्या खासदार आहे. दादरा नगर हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर ही जागा रिक्त होती. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर डेलकर कुटुंबीयांनी भाजपावर आरोप केले होते. नंतर दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर आणि त्यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला होता आणि शिवसेनेनं पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली होती.

कलाबेन डेलकर यांनी भाजपाच्या महेश गावित यांचा पराभव केला. कलाबेन डेलकर यांना १ लाख १६ हजार ८३४ तर भाजपाच्या महेश गावित यांना ६६ हजार १५७ मतं मिळाली आहेत. कलाबेन डेलकर यांनी भाजपाच्या उमेदवाराचा ५० हजार ६७७ मतांनी पराभव केला आहे,

