मुंबई- शिवसेनेकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांची हकालपट्टी केल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. या संदर्भात आज दिनांक ३ जुलै २०२२ रोजी सामना दैनिकामध्ये मध्ये छापून आलेली बातमी अनावधानाने छापून आलेली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेमध्येच कार्यरत आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यलयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे. त्यामुळे हा आदेश नेमका कोणाकडून काढण्यात आला होता, याविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत.


