शिवसेनेच्या 32 वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही:नारायण राणे

Date:

आज बाळासाहेब असते तर म्हणाले असते, अशीच प्रगती कर

मुंबई-शिवसेनेचा मुंबई मनपातील 32 वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपचेच सरकार येईल. मुंबई महापालिका जिंकणे ही आमची जबाबदारी आहे. ही महापालिका काही झाले तरी आम्ही जिंकणारच, असा निर्धार केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. मुंबई विमानतळावरुन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करुन ही यात्रा शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळ येथे दाखल झाले. यावेळी नारायण राणेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केले. यासोबतच त्यांच्या स्मृतींनाही उजाळा दिला.

नारायण राणेंना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊ देणार नाही असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता. मात्र राणेंनी आज नितेश राणे, प्रवीण दरेकर यांच्यासह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन केले. यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासमोर जाऊन मी नतमस्तक झालो. मी त्यांना एवढेच सांगितले की, आज तुम्ही मला आशीर्वाद द्यायला असायला हवे होतात. मला बाळासाहेबांनीच घडवलेले आहे, दिलेले आहे. आजही ते असते तर म्हणाले असते, नारायण तू असेच यश मिळव आणि प्रगती कर माझा आशीर्वाद आहेत. असे म्हणत त्यांनी डोक्यावर हात ठेवला असता. आज त्यांचा हात नसला तरी आशीर्वाद माझ्यासोबत आहेत’ असे राणे म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला...

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...