ठाकरे सरकार हे काँग्रेसच्या टेकूवर उभे आहे, हे शिवसेनेने लक्षात ठेवावे; नाना पटोलेंचा संजय राऊतांना इशारा

Date:

मुंबई- राज्यातील महाविकासआघाडी सरकार हे काँग्रेसच्या टेकूवर उभे आहे, ही बाब शिवसेनेने लक्षात ठेवावी असा स्पष्ट टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लागवला आहे. युपीएचे नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना देण्यात यावे असे वक्तव्य राउतांनी केले होते. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना नेते संजय राऊतांमध्ये वाक् युद्ध सुरू झाले आहे. आता त्यांनी शिवसेनेला थेट इशाराच दिला आहे.

संजय राऊतांकडून शरद पवारांना यूपीएचे अध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. यावरुन काँग्रेसकडून राऊतांवर निशाणा साधला जात आहे. शनिवारी भिवंडी येथे माध्यमांशी बोलताना नाना पटोलेंनी या विषयावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या टेकूवर उभे आहे, ही गोष्ट शिवसेनेने लक्षात ठेवावी असा इशाराच नाना पटोलेंनी राऊतांना दिला आहे. तसेच यूपीएच्या अध्यक्षपदासाठी राऊतांकडून सुरु असलेली शरद पवारांची वकिली त्यांनी थांबवायला हवी असेही पटोले म्हणाले.

…ही हस्यास्पद मागणी आहे

दरम्यान महाविकास आघाडी सरकारमध्ये काही आलबेल नसल्याचे चित्र यावरुन दिसत आहे. नाना पटोले पुन्हा एकदा म्हणाले की, संजय राऊत यांची वक्तव्य पाहता ते शिवसेनेचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत हा प्रश्न पडला आहे. पुढे पटोले म्हणाले की, दिल्लीमध्ये यूपीए 2 स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि यासाठी नेतृत्त्व शरद पवारांना द्यावी ही हस्यास्पद मागणी आहे. तसेच शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षात आहेत की शिवसेनेत हे तपासावे लागेल. तर राऊत हे शिवसेना नेते आहेत, सामनाचे संपादक आहेत मात्र ते शरद पवारांचे प्रवक्ते झाल्यासारखे बोलत आहेत’ असा टोला पटोलेंनी लगावला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

किडनी विक्री प्रकरणातील सावकरांवर कधी कारवाई करणार? – वडेट्टीवार

मुंबई- विदर्भातील शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकवी लागल्याचा प्रकार...

DGCA कडून विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न:अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार...

घरकुल लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर मिळाली नाही,जनाची नाही तर मनाची ठेवा – वडेट्टीवार

मुंबई- राज्यातील घरकुल योजनेतील घरं मंजूर होऊनही गेल्या तीन...

अमेरिकेत हिमवादळामुळे 11 हजार विमानांची उड्डाणे रद्द:5 लाख घरांची वीज गेली, 153 वर्षांत पहिल्यांदाच वर्तमानपत्र छापले जाऊ शकले नाही

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेत जोरदार वाऱ्यांमुळे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे विमानतळावरील धावपट्ट्या...