शिवसेनेच्या खासदार भावना गवळींची लोकसभा प्रतोदपदावरून उचलबांगडी!

Date:

आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधी शिवसेनेनं मोठा निर्णय घेतला आहे. ईडीच्या रडारवर असलेल्या शिवसेनेच्या लोकसभेतील प्रतोद भावना गवळी यांची उचलबांगडी करत खासदार राजन विचारे यांची पक्षाच्या लोकसभा प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना पाठवलेलं पत्र सध्या व्हायरल होत आहे.दोनच आठवड्यांपूर्वी एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांच्या बंडखोरीनंतर भावना गवळी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिंदे गटाच्या कलाने निर्णय घेण्याची विनंती केली होती. “आपले आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपणास एक मोठा निर्णय घेण्यासाठी विनंती करत आहेत. त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता कठीण असला तरी शिवसैनिकांसाठी निर्णय घ्यावा ही विनंती”, अशा आशयाचं पत्र गवळी यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं.

महाराष्ट्रात राजकीय घडामोडी सुरू होण्याच्याही आधी भावना गवळी ईडीच्या रडारवर होत्या. त्यांना ईडीकडून नोटीस देखील बजावण्यात आली होती. सध्या एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना ईडीची भिती दाखवून तिकडे वळवण्यात आल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर लोकसभेत देखील शिवसेनेला विधानसभेप्रमाणेच पेचप्रसंगाचा सामना करावा लागू नये, यासाठी खबरदारी म्हणून शिवसेनेनं हे पाऊल उचलल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...