शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह 16 मंत्रिपदे..?

Date:

मुंबई : २०१४ च्या तुलनेत महत्त्वाची मंत्रिपदे मिळण्यासाठी शिवसेनेकडून सुरू असलेल्या दबावतंत्राला यश येत आहे. उपमुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपदे शिवसेनेला देण्यास भाजप तयार आहे. तसा अधिकृत प्रस्तावही शिवसेनेला देण्यात आला असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली. यात सार्वजनिक बांधकाम खात्यासह अन्य महत्त्वाची खाती शिवसेनेकडे सोपवण्यात येणार आहेत. या खात्यांबाबत चर्चा सुरू असून एक-दोन दिवसांत यादी अंतिम हाेण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, शिवसेना आमदारांची महत्त्वाची बैठक गुरुवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाेणार असून त्यात पक्षाचा गटनेता निवडला जाणार आहे.

आदित्य यांना तूर्त मंत्रिपद नाहीच?

उपमुख्यमंत्रिपदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र ‘त्यांना इतक्यात मंत्रीपद देण्याची घाई उद्धव ठाकरे करणार नाहीत,’ अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. ‘आदित्य यांना अगोदर सर्व समजून घेऊ दे, शिकू दे, त्यानंतरच त्यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल,’ असे उद्धव यांनी यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात आदित्य हे आमदार म्हणूनच विधिमंडळात दिसू शकतील, असेही सूत्रांनी सांगितले.

या वेळी १६ ते १७ मंत्रिपदे-उपमुख्यमंत्रिपदाचीही ऑफर

बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी ५०-५० च्या फॉर्म्युल्याची माहिती नसल्याचे सांगताच शिवसेनेने युतीमधील बैठकच रद्द केली हाेती. त्यामुळे युतीत तणावाचे वातावरण हाेते. मात्र, फडणवीस यांनी युतीत बैठकांचे सत्र सुरू असल्याचे स्पष्ट केले. युतीतील सत्तावाटपाबाबत भाजपमधील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले, दाेन्ही पक्षांत सत्तावाटपाचे काही फॉर्म्युले तयार आहेत. त्यावर चर्चा सुरू आहे. शिवसेना आमचा मित्रपक्ष असल्याने त्यांचा आम्ही योग्य तो मानसन्मान ठेवत आहोत. गेल्या वेळी त्यांना १४ मंत्रिपदे दिली हाेती. या वेळी १६ ते १७ मंत्रिपदे दिली जाऊ शकतात. त्यांना उपमुख्यमंत्रिपदाचीही ऑफर देण्यात आलेली आहे. अजून यावर अंतिम निर्णय झालेला नसला तरी एक-दोन बैठकांत अंतिम निर्णय होऊ शकताे, असेही या नेत्याने सांगितले. उपमुख्यमंत्रिपदासाठी शिंदे, देसाईंची नावे : ‘भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे का?’ या प्रश्नावर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, ‘अशी काही ऑफर आल्याचे मला ठाऊक नाही आणि आली असेल तर उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील. मंत्र्यांची संख्या आणि अन्य बाबी या फक्त माध्यमातच आहेत. तुमच्याकडे काही लिखित स्वरूपात असेल तर दाखवा,’ असेही ते म्हणाले. तर दुसरीकडे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले, ‘जर भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊ केले तर आमच्याकडे एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई अशी दोन नावे आहेत. मात्र त्यातही सुभाष देसाई यांचे पारडे जड असू शकेल.’

गृह विभाग फडणवीस साेडणार नाहीत…

भाजप आमदारांनी बुधवारी विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली. दरम्यान, भाजपने मंत्रिमंडळाची तयारी सुरू केली असून फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपदासोबतच गृह तर मुनगंटीवारांकडे अर्थ खाते कायम राहील. राधाकृष्ण विखे, डॉ. संजय कुटे, गणेश नाईक, शिवेंद्रराजे भोसले, आशिष शेलार यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

किडनी विक्री प्रकरणातील सावकरांवर कधी कारवाई करणार? – वडेट्टीवार

मुंबई- विदर्भातील शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकवी लागल्याचा प्रकार...

DGCA कडून विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न:अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार...

घरकुल लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर मिळाली नाही,जनाची नाही तर मनाची ठेवा – वडेट्टीवार

मुंबई- राज्यातील घरकुल योजनेतील घरं मंजूर होऊनही गेल्या तीन...

अमेरिकेत हिमवादळामुळे 11 हजार विमानांची उड्डाणे रद्द:5 लाख घरांची वीज गेली, 153 वर्षांत पहिल्यांदाच वर्तमानपत्र छापले जाऊ शकले नाही

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेत जोरदार वाऱ्यांमुळे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे विमानतळावरील धावपट्ट्या...