पुणे- शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एका 24 वर्षीय तरुणीनं कुचिक यांच्या विरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीवरुनच पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाचं आमिष दाखवून कुचिक यांनी शारिरीक संबंध ठेवले आणि गर्भवती राहिल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीनं गर्भपात करण्यास भाग पाडलं, असा आरोप या तरुणीनं तक्रारीत केला होता. त्यानुसार पोलिसांनी कुचिक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 24 वर्षाच्या तरुणीनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2022 दरम्यान घडल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पुणे, गोवा याठिकाणी असलेल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. तरुणीनं तक्रारीत रघुनाथ कुचिक यांनी लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरीक संबंध ठेवले. त्यांच्यापासून तरुणी गरोदर राहिली. हे कळताच रघुनाथ कुचिक यांनी जबरदस्तीनं गर्भपात करुन तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी रघुनाथ बबनराव कुचिक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

