शिंदे गटाची उद्धव ठाकरेंनाच ऑफर:आमच्यासोबत या, शेवट गोड करू

Date:

मुंबई-आम्ही शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली, त्यात आम्ही पक्षप्रमुख पदावर कुणाची नियुक्ती केली नाही. त्यांनी आमच्यासोबत यावे आणि पक्षप्रमुखपद स्वीकारावे अशी ऑफरच त्यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे. आम्हाला या सर्व गोष्ट्रीचा शेवट गोड व्हावा असे वाटते आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख पदापेक्षा राज्याचे मुख्यमंत्रिपद मोठे आहे. असेही दीपक केसरकरांनी म्हटले आहे. यामुळे आता उद्धव ठाकरेंपेक्षा पक्षात एकनाथ शिंदेंना बंडखोर आमदारांनी मोठे पद अन् मान दिल्याचेही एका शब्दांत दिसून आले.

माजी मुख्यमंत्रिपदाचा उल्लेख करणे हे अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून शुभेच्छा देताना तसा उल्लेख केला पक्षप्रमुख पद हे पक्षापूरते मर्यादित असते तर मुख्यमंत्रिपद हे महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी असते असे म्हणत हे मुख्यमंत्रिपद हे शिवसेना प्रमुख पदापेक्षा मोठे पद असल्याचा टोला केसरकरांनी लगावला आहे. यामुळे गैरसमज करून घेऊ नका असेही त्यांनी म्हटले आहे.

ठाकरेंना हिंदुत्व जपता आले पाहिजे!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्व जपता आले पाहिजे असा टोमणा लगावला आहे. तर आज बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंच्या पुन्हा निवडणूक लढवण्याचा मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे. आदित्य ठाकरेंनी निवडून येण्यासाठी मतदारसंघातील 2 माजी आमदारांना विधान परिषदेचे सदस्य करावे लागले यातच सगळे आल्याची खरपूस टीका दीपक केसरकरांनी केली आहे.

काय म्हणाले केसरकर?

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही ज्यांच्या सोबतीने मते मागितली होती. त्यांच्यासोबत गेलो आहोत. शिवसेना – भाजप युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले असले तरी तुम्ही त्यांच्यासोबत राहिला नाहीत. महाविकास आघाडी तयार केल्यानंतर तुम्ही जनतेसमोर गेले नाही. आम्ही मुळ विचारधारेसोबत गेलो आहोत. आम्ही लोकांमधून निवडून आलो आहोत. आमच्यासोबत असलेल्या आमदारांची मतदारसंघात वेगळी ओळख आहे. त्यांच्या स्वत:च्या छबीवर ते निवडून आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...