पुणे –महानगरपालिकेत समाविष्ट झालेली ३४ गावे वगळण्याचा घाट शिंदे -फडणवीस सरकारने घातला असून तो आपण आणि कार्यकर्ते व राष्ट्रवादी पार्टी कादापीही यशस्वी होऊ देणार नाही असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज दिले आहे. नवी दिल्लीतून आपण महापालिका निवडणुका तातडीने घ्याव्यात या साठी न्यायालयीन लढा देत आहोत . हे सरकार पराभव दिसत असल्याने निवडणुकांना घाबरत आहे असेही ते म्हणालेत .
जगताप पुढेम्हणाले,’ महानगरपालिकेत समाविष्ट झालेली ३४ गावे महापालिका क्षेत्रातून वगळण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तीव्र विरोध आहे. पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेली गावे ही मोठ्या संघर्षानंतर पुणे महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झाली आहे. पुणे महानगरपालिका ही राज्यातील क्षेत्रफळानुसार क्रमांक एकची महानगरपालिका असून सांस्कृतिक औद्योगिक, शैक्षणिक राजधानी असल्याने पुण्यासह लगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून गेल्या अनेक वर्षांपासून या नागरिकांना पुणे महानगरपालिकेत समाविष्ट होण्याची प्रतीक्षा होती. गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सदर गावे समाविष्ट देखील झाली, परंतु ही गावे समाविष्ट करण्यास भाजपचा अगोदर पासून विरोध होता. ही गावे 1997 साली पुणे महानगरपालिकेत समाविष्ट होने अपेक्षित होते, परंतु तत्कालीन युती सरकारमधील भारतीय जनता पार्टीने ही गावे समाविष्ट करण्यास विरोध केला. त्यामुळे त्यानंतर झालेल्या मोठ्या न्यायालयीन लढाईनंतर ही गावे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पुन्हा भारतीय जनता पार्टीने ही गावे वगळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ही गावे समाविष्ट झाली तर आगामी निवडणुकीत आपला पराभव होऊ शकतो , अशी भीती भाजपच्या पदाधिकाऱ्यांना वाटते. त्यामुळेच नागरिकांच्या सोयीसुविधांपेक्षा स्वतःच्या मताच्या राजकारणाचा विचार करत भारतीय जनता पार्टी हे गलिच्छ राजकारण करून पाहत आहे. मुळात या गावातील नागरिकांना पुणे महानगरपालिकेत राहण्याचा पूर्ण अधिकार आहे.कारण समाविष्ट झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेतर्फे या गावात सोयी सुविधा देण्यास काही प्रमाणात सुरुवात देखील झाली आहे. आता पुन्हा ही सर्व यंत्रणा बदलण्याचा निर्णय अन्यायकारक असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा याला कडाडून विरोध राहील.
भविष्यात ही लढाई रस्त्यावर उतरून तसेच न्यायालयाच्या माध्यमातून देखील लढली जाईल. पुणे महानगरपालिकेत समाविष्ट गावांसह महानगरपालिकेची निवडणूक घेण्यात यावी कारण तशाप्रकारे निवडणुकीची तयारी देखील गेल्या काळात पूर्ण झाली होती. परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकार च्या जागी शिंदे- फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर नागरिकांच्या सोयीसुविधांपेक्षा स्वतःच्या मतांचा विचार करत गलिच्छ राजकारणाचा प्रकार संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे . त्याचाच एक भाग अर्थात पुणे महानगरपालिकेतबाबत देखील सुरू आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि समाविष्ट गाव गावे कृती समिती हे कधीही शक्य होऊ देणार नाही” , असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे.

