बॉर्डरलेस वर्ल्ड फौंडेशन- माणुसकी हा एकमेव निकष आणि दृष्टिकोन ..

Date:

शिल्पा देशपांडे ,पुणे
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत )

 

काश्मीर खोरे पेटले आहे कित्येक वर्षांपासून ऐकत आहोत मुळाशी जाऊन सखोल अभ्यासही तज्ञ लोक करत आहेत राजकीय पक्ष राजकारण अर्थकारण सगळीच कारणे आहेत .जनतेचा प्रक्षोभ उसळत आहे प्रत्येक बाजूनी परिस्थीतिचे विश्लेषण होत आहे .आतंकवाद आणि काश्मीर हे समीकरण बनून प्रकरण चिघळत आहे .लष्कर ,दहशतवादी, काश्मिरी जनता यांची स्वअस्तिवाची लढाई आता जोर धरू लागली आहे .अकारण किंवा कारणाने निर्माण झालेला लष्करी राग स्वतःचाच जीव घेत आहे,युवक वर्गात चुकीच्या सामंजस्यातून निर्माण झालेल्या तेढीचे रूपांतर हिंसक मार्गाने व्यक्त होत आहे .स्वतःच्याच घराला पेटवणारी कल्पना काहींना क्रांतिकारी वाटत आहे,उसळत्या रक्तात उन्मेष नाही उन्माद माजतो आहे .सुंदर सौन्दर्य लाभलेले काश्मीरचे रस्ते गेल्या कित्येक वर्षांपासून निर्जीव आहेत, संचारबंदी ,दहशतवादाची गडद छायेत सगळेच विस्कळीत आहे, फुटीरवादाच्या उंबरठ्यावर बंधुभावाची चौकट उसकटू पाहत आहे.
ह्या सगळ्या धगधगीत पार्श्वभूमीवर द्वेषाच्या काटेरी कुंपणाच्या बाहेर एक आशावाद अजूनही हातात शांतीची ,मानवतेची मशाल घेऊन ‘मानवतावाद’प्रस्थापित करू पाहत आहे.,त्या आशावादाचे नाव आहे ‘अधिक कदम’!बॉर्डरलेस वर्ल्ड फौंडेशन अर्थात सीमा नसलेली हि संस्था मानवतेची बीजे गेली १५-१६ वर्षे रुजवत आहे. माणुसकी हा एकमेव निकष आणि दृष्टिकोन ठेवल्यास हि अंतर्गत तेढ कमी होईल येथील प्रश्नांकडे केवळ तर्कबुद्धीने न पाहता जाणिवेने ,संवेदनशीलतेने पाहणे गरजेचे आहे. सामाजिक संस्थांचे न कार्याचे पेव फुटले आहे असे असतानां बोटावर मोजता येणाऱ्या संस्था खऱ्या आत्मीयतेने काम करतात ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फौंडेशन ‘सिमेच्यापलीकडे मग त्या सीमा प्रादेशिक .वयक्तीक ,भौगोलिक व धार्मिक ..या सगळ्यापलीकडे जाऊन मानवतेचे नवे संदर्भ शोधत आहे भारत,आर्मी काश्मिरीयत आदी विशेषणे या संस्थेला माहितीच नाहीत माणुसकीच्या धरतीतून अंकुरलेले बीज आता वृक्ष होऊन अनेक अनाथ मुलींसाठी सावली बनू पाहत आहे ,सीमेच्या मर्यादेपलीकडे जाऊन प्रेमाचा झरा आविर्रत झरणाऱ्या युवा नेतृत्वाचा केवळ सत्कार करून चालणार नाही हे नेतृत्व स्वीकारता यायला हवे ते अंगिकारता गेले पाहिजे .खोलवर रुतलेली आतंकवादाची पाळंमुळं नष्ट झाल्याशिवाय नवी मानवतेची सकस जमीन तयार होणार नाही काश्मिरी खोऱ्यातील भलभळीत जखम केवळ प्रेमानेच भरून येणार आहे .आतंकवादाचे मूळ शोधून ते उपटने गरजेचे आहे म्हणूनच बॉर्डरलेस च्या या अनाथ झालेल्या मुली शांतिदूतांचे कार्य करतील कारण दहशतवाद,संघर्ष आणि हरवलेले आई बापाचे छत्र यामुळे संवेदनशील मन नक्कीच मानवतावादी होऊन शांतीचा मानवतेचा संदेश पसरवेल असा अधिक विश्वास आहे . हि यशोगाथा केवळ अधिकचीच असू नये तर भविष्यात तरुणांनी चाकोरीबद्ध मार्ग सोडून नवी पाऊलवाट निवडून अशा कार्यासाठी पुढे आले पाहिजे .काश्मीर प्रश्न हा केवळ सरकारचाच नाही आपल्या बंधू भगिनींचाही आहे ,आपला आहे ,इथे राहणारे आपलीच लोक आहेत हि भावना प्रत्येक भारतीयांत उतरायला हवी .तरुण रक्तातून उसळणारी प्रत्येक लाट देशहिताकारकच असणे गरजेचे आहे कारण कुंपणच सुरक्षित नसेल तर घर कसे सुरक्षित राहणार ?कुंपणही मानवनिर्मित आहे आणि येथील हिंसाचारही… तो आपणच संपवणे गरजेचे आहे ,आपल्याला काश्मीरची नुसती जमीन नको आपली लोकही हवी आहेत काश्मीरी लोकांना केवळ आत्मीयता हवी आहे काश्मीर सौन्दर्याने नटलेला प्रांत आहे .निसर्गनिर्मित अशा कित्येक गोष्टी येथे आहेत जे देशप्रगतीच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत कित्येक औद्योगिक चालना देणाऱ्या गोष्टी आहेत असे असून सुद्धा येते पुरेशा सोयी सुविधा नाहीत जनजीवन विस्कळीत व कित्येक सुविधांनी वंचित आहे ,वैद्यकीय सुविधा नाहीत .बंदुकीच्या धाकात जगणारी हि माणसे भारताचाच एक अंग आहेत योग्य शिक्षण ,पुरेशी साधने नाहीत अशा परिस्थितीत जगणारे मग आतंकवादाचे बळी ठरतात किंबहुना दहशत वादाचे गंभीर परिणामाचा सारासार विचारही ते करत नाहीत सारासार विचार प्रेमाच्या मार्गाने लवकर रुजला जातो ,.एकीकडे महासतेकडे वाटचाल करताना येथील परिस्थिती नकीच विषम वाटते

काश्मिरीयत हि जाणीव नाही तर्क आहे ताबा प्रांतावर करण्यापेक्षा हृदयात स्थान मिळवण्यात यशस्वी झाल्याची घटना तर ताजीच आहे खोऱ्यामध्ये आर्मी आणि  लोक यांच्या संघर्षात नाईलाजाने जमावाला नियंत्रित करण्यासाठी आर्मीला पॅलेट गन्सचा वापर करावा लागला पण त्याचबरोबरीने बॉर्डरलेस ने केवळ मानवतावादी दृष्टिकोन ठेवून निष्णात डॉक्टरांची फौज पाठवून दिली कित्येक जीव कायमचे अंध होण्यापासून वाचले गेले तसेच कार्डियाक आणि ट्रामा ची रुग्णवाहिकाही पोहचवली डॉक्टर नटराजन ,मारवा, परांजपे आदी अनेक डॉक्टरांनी मोफत शास्त्रलिया केल्या /करत आहेत याचाच अर्थात आपलेच लोक आपल्याच लोकांसाठी धावूं येत आहेत मग हि तेढ ,हि धुम्मस आता थांबली पाहिजे बॉर्डरलेस चे व याच प्रकारे काम करणारे अनेक स्वयंसेवी संघटना सरकार आणियेथील लोकांचा दुवा ठरतील आबा आहे फक्त पारदर्शक नजरेची न निर्धाराची !मानवतेची नवी लाट नवीन प्रवाहाचे द्योतक ठरेल यात शंकाच नाही

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा:पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक एकबोटेंना छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदी

छावा चित्रपटातील संभाजी महाराजांच्या मृत्युपूर्व दृश्यांनी कबरीबाबतच्या भावना तीव्र...

आगीमुळे ४०० केव्ही टॉवर लाइनला ट्रिपिंग; चाकण,पिंपरी, भोसरी, मंचर ग्रामीणमध्ये तासभर वीज खंडित

पुणे, दि. १५ मार्च २०२५: तळेगाव येथील पीजीसीआयएल ४०० केव्ही...

धायरीच्या मध्यवस्तीतील दुर्घटनाग्रस्त कचरा विलिनीकरण प्रकल्प न हलविल्यास जन आंदोलन

आम आदमी पक्षाचा इशारा पुणे:सिंहगड रस्त्यावरील धायरी येथील मध्यवस्तीतील बेनकर...