एमएसएलटीए-ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी चॅम्पियनशीप सिरीज राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत शिबानी गुप्ते हिला दुहेरी मुकुट

Date:

मुलांच्या गटात आर्यन किर्तने याला विजेतेपद

पुणे, 22 एप्रिल 2022: ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित, एमक्युअर फार्मासिटिकल पुरस्कृत व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी चॅम्पियनशीप सिरीज 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात शिबानी गुप्ते हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, मुलांच्या गटात आर्यन किर्तने याने विजेतेपद पटकावले. 

नटराज टेनिस कोर्ट, कर्वेनगर येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात आर्यन किर्तने याने अव्वल मानांकित स्मित उंडरेचा 3-6, 6-0, 6-2 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. आर्यन हा बिशप्स शाळेत सहावी इयत्तेत शिकत असून आदर पुनावाला टेनिस अकादमी व डेक्कन जिमखाना क्लब,मध्ये प्रशिक्षक प्रसनजीत पॉल व नितीन किर्तने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. ,त्याचे हे या वर्षातील पहिलेच विजेतेपद आहे. दुहेरीत अंतिम फेरीत स्मित उंडरे व वरद उंडरे यांनी आर्यन किर्तने व आरव पटेल यांचा 7-5, 2-6, 10-8 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. मुलींच्या गटात अंतिम फेरीत शिबानी गुप्तेने चौथ्या मानांकित रित्सा कोंडकरचा 6-3, 6-7(4), 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. शिबानी ही विद्या व्हॅली शाळेत पाचवी इयत्तेत शिकत असून ओम दळवी टेनिस अकादमीत प्रशिक्षक मारुती राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. या वर्षातील या गटातील तिचे हे पाचवे विजेतेपद आहे. दुहेरीत मुलींच्या गटात अंतिम लढतीत मायरा टोपणो व शिबानी गुप्ते या जोडीने दुसऱ्या मानांकित रित्सा कोंडकर व काव्या पांडे या जोडीचा 2-6, 7-5, 10-7 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक, प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एम्क्युअर फार्मास्युटिकल लिमिटेडच्या सीएसआर विभागाचे मुख्य गिरीश घनवट आणि सहसंचालक एचआर विभागाचे अंकुश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा संचालक रिया किर्तने आदी मान्यवर उपस्थित होते. 
निकाल: अंतिम फेरी: मुले: आर्यन किर्तने वि.वि.स्मित उंडरे[1]3-6, 6-0, 6-2; मुली:  शिबानी गुप्ते वि.वि.रित्सा कोंडकर [4] 6-3, 6-7(4), 6-1; दुहेरी गट: अंतिम फेरी: मुले: स्मित उंडरे/वरद उंडरे[1]वि.वि.आर्यन किर्तने/आरव पटेल[4] 7-5, 2-6, 10-8; 
मुली: मायरा टोपणो/शिबानी गुप्ते वि.वि.रित्सा कोंडकर/काव्या पांडे[2] 2-6, 7-5, 10-7.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कर्ज कमी करायला मदत म्हणून नॉयडा येथील जमीन विक्रीचे नियोजन

एवररेडी इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 26च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये एकत्रित महसूल आणि EBITDA मध्ये...

बांधकाम कामगारांसाठी गोदरेज प्रॉपर्टीजचा ‘गोदरेज सहयोग’ हा मानसिक आरोग्य उपक्रम

पुणे - भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट विकासकांपैकी एक असलेल्या गोदरेज...

मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई -महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी...

वगनाट्याची ‘परंपरा आणि योगदान’ सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारे लोककला अभ्यासकांचे चर्चासत्रात प्रखर मत..

मुंबई – लोकसंस्कृतीच्या समृद्ध परंपरेत तमाशा कलेने समाजमनावर कोरलेली...