या आजाराचा सामना करत आहेत सुमारे ८ कोटी भारतीय …(इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस )

Date:

पुणे: जागतिक आरोग्य परिषदेने १००० लोकांतून एका व्यक्तीला होणारा किंवा त्याहूनही कमी प्रमाणात आढळून येणारा, रुग्णास आयुष्यभरासाठी अक्षम बनविणारा आजार अशी दुर्मिळ आजाराची व्याख्या केली आहे. मात्र २०११च्या जनगणनेनुसार ७.२ कोटी भारतीय दुर्मिळ आजारांचा सामना करत आहेत.इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस (IPF), हा असाच दुर्धर, हळूहळू गंभीर स्वरूप धारण करत जाणारा फुफ्फुसांचा आंतरकोशिकीय आजार आहे. हा आजार अनेक पातळ्यांवर ओळखता न आल्याने तो वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहतो व त्याचे संपूर्ण निदान केले जात नाही. आयपीएफच्या वाढत्या प्रमाणाबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या उद्दीष्टाने घेतल्या गेलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये डॉ. महावीर मोदी आणि डॉ. नितीन अभ्यंकर यांनी आयपीएफच्या पुण्यातील वाढत्या प्रादुर्भावाबद्दल हि माहिती दिली.

ते म्हणाले ,’भारताच्या आरोग्यव्यवस्थेवर ट्युबरक्युलोसिस अर्थात टीबीचा भार खूप जास्त आहे व हा आजार श्वसनयंत्रणेशी संबंधित आजारांचा बराचसा भाग व्यापून आहे आणि भारतामध्ये आयपीएफचा प्रादुर्भाव होण्यामागचे प्रमुख कारण हेच आहे. अमेरिकन जर्नल ऑफ रेस्पिरेटरी अँड क्रिटिकल केअर मेडिसिनच्या २०१५च्या अंकातील माहितीनुसार टीबीच्या जगभरातील ९.६ दशलक्ष प्रकरणांपैकी एकट्या भारतातील प्रकरणांची संख्या २.२ दशलक्ष होती.

इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस हा एक प्रकारचा फुफ्फुसांचा आजार आहे व या आजारात अज्ञात कारणांमुळे फुफ्फुसाच्या उतींवर ओरखडे येतात. हा आजार होण्यामागचे महत्त्वाचे कारण हे धूळ किंवा केमिकल्सच्या सान्निध्यात येणे, धूम्रपान, कुटुंबात आयपीएफचा पूर्वेतिहास असणे, विषाणूंचा संसर्ग अशा गोष्टींशी संबंधित असू शकते. याच्या परिणामी फुफ्फुसांची हानी होते व त्यांवर ओरखडे (फायब्रॉसिस) उठतात, कालांतराने फुफ्फुसांची क्षमता क्षीण होत गेल्याने रुग्णाच्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होणे कठीण बनते व त्यामुळे अशा रुग्णाला आपली दैनंदिन कामे करण्यात अडथळा येऊ लागतो.

आयपीएफच्या पुण्यातील घटनांविषयी बोलताना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे सल्लागार फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. महावीर मोदी म्हणाले, गेल्या १० वर्षांमध्ये आयपीएफ रुग्णांच्या संख्येत वर्षाकाठी ५-७% वाढ झाली आहे. या आजाराची लक्षणे रुग्णागणिक वेगळी असली तरीही असाध्य कोरडा खोकला, धाप लागणे, वजन/भूक कमी होणे आणि बोटांची नखे बहिर्गोल बनणे ही त्याची लक्षणे सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळून येतात. आयपीएफ हा आजार पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतो. या रोगाचे स्त्री-पुरुषांतील गुणोत्तर ४:१  इतके दिसून येते. म्हणूनच चिन्हे आणि लक्षणे दिसू लागताच त्यांची विशेषज्ञांकडून तपासणी करून घेण्याची गरज असते. सरसकटपणे सांगायचे तर हा आजार पूर्णपणे बरा करण्याचा कोणताही उपाय नाही कारण फुफ्फुसांवर ओरखडे पडल्याने त्यांची क्षमता नष्ट होत जाणे अपरिहार्य आहे व हे नुकसान कधीच भरून निघू शकत नाही.

आयपीएफ आजाराची लक्षणे आणि उपचारांचा रुग्णांवर व त्याच्या कुटुंबियांवर लक्षणीय शारीरिक, मानसिक आणि भावनिक परिणाम होऊ शकतो. आजार हळूहळू बळावत जात असताना रुग्णाच्या हालचालींमध्ये बाधा येऊ शकते.

आयपीएफचे निदान आणि व्यवस्‍थापन यांबाबतचे ठळक मुद्दे सांगताना स्पायरोमेट्री क्लिनिक आणि पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील कन्सल्टन्ट डॉ. नितीन अभ्यंकर म्हणाले, रक्ततपासणी, रेडिओलॉजिकल स्कॅन्‍स आणि बायोप्सीद्वारे या स्थितीचे निदान केले जाते. या आजाराचे व्यवस्थापन करण्याच्या पद्धतींविषयी रुग्णांशी चर्चा करता येते. यासंदर्भात वर्षातून किमान एकदा तरी नियमितपणे तपासणी करून घेण्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा करायला हवी. तुमच्या कुटुंबात या आजाराचा पूर्वेतिहास असेल तर अशी तपासणी करून घेणे अनिवार्य आहे. नियमितपणे तपासण्या केल्यास आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या उपचारांचे काटेकोर पालन केल्यास आयपीएफची स्थिती हाताळणे शक्य आहे. या आजाराच्या रुग्णांना धूम्रपान सोडण्याचा, व्यायाम करण्याचा तसेच पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रॉसिसच्या पैकी प्रकरणांचे निदान खूप उशीरा होते. म्हणूनच आयपीएफचे सुरुवातीच्या टप्प्यावरच निदान होणे महत्त्वाचे आहे. कारण त्यामुळे हा आजार कमी होण्यास व त्याची वाढ आटोक्यात ठेवण्यास मदत होऊ शकेल.

लवकरात लवकर झालेले निदान आणि उपचार यांमुळे रुग्णाचे आयुष्य लांबू शकते. कुटुंबात या आजाराचा पूर्वेतिहास असलेल्या व्यक्तीने स्वत:ची नियमितपणे चाचणी करून घेणे आणि डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार नियमित उपचार करून घेणे अनिवार्य आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सर्व धर्मीय ख्रिसमस स्नेह मेळावा संपन्न

पुणे; पुण्यातील येरवडा – शास्त्रीनगर भागातील सेक्रेड हार्ट चर्च येथे...

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार•...

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...

सत्तेच्या लोभी राजकारणाला आम आदमी पार्टी शह देईल..अरविंद केजरीवाल,भगवंत मान पुण्यात प्रचाराला येणार

पुणे- ' महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा सोडून सामान्य...