पुणे: “तुम्ही जेव्हा दडपणाखाली असाल, व्यसनाधीन झाला असाल आणि आत्महत्येचा विचार डोकावत असेल त्यावेळी आपल्या पालकांचा विचार करा, त्यांनी तुमच्यावर केलेले प्रेम आणि त्यांचा त्याग तुमच्या लक्षात येईल” असे मार्गदर्शन सिद्धार्थ जाधव यांनी सुर्यदत्त कॅम्पसच्या विद्यार्थ्यांना केले. ‘शासन’ या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मराठीतले प्रसिद्ध कलाकार मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, अदिती भागवत यांनी सुर्यदत्त बावधन कँम्पसला भेट दिली.
सध्याच्या परिस्थितीपेक्षा वेगळ्या पद्धतीच्या सिस्टमवर हा चित्रपट भाष्य करतो, तसेच प्रत्येक क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे, त्यामुळे आत्मविश्वासाने स्पर्धेला सामोरे जा असेदेखील सिद्धार्थ जाधव यावेळी म्हणाले.
या कलाकारांचे यावेळी युवा ‘सुर्यांस’ च्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले. त्याआधी सुर्यांस यांनी गाणी गायली आणि नृत्यही केले. याशिवाय
लोकप्रिय मराठी – हिंदी लोकगीतांच्या गाण्यांची मिमिक्री सादर करण्यात आली, त्यालाही उपस्थितांनीही भरभरून दाद दिली.
‘शासन’ चित्रपटाच्या कलाकारांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय बी. चोरडिया तसेच उपाध्यक्ष श्रीमती. सुषमा चोरडिया यांनी त्यांचे स्वागत केले. ‘शासन’ चित्रपट हा समाजातील प्रत्येकासाठी असून, चित्रपटातील सर्व कलाकारांनी समाजाला
दिलेली ही भेट असल्याचे चोरडिया दांपत्यांनी सांगितले.
आयुष्यात काहीतरी वेगळे करू इच्छिणाऱ्यांसाठी हा चित्रपट आहे. २०१६ या वर्षाच्या सुरूवातीलाच भ्रष्टाचार, अॅट्रॉसिटी, समाजातील कच्चे दुवे यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
‘शासन’ चित्रपटाच्या यशासाठी डॉ. चोरडिया यांनी कलाकारांच्या पूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच सुर्यांस यांनी हा चित्रपट आपले कुटुंबिय, मित्र आणि समाजातील इतर घटकांसोबत पहावा, अशी विनंती डॉ. चोरडिया यांनी केली.
‘शासन’ चित्रपटातील कलाकार मकरंद अनासपुरे यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, या चित्रपटात इतरही अनेक कलाकार आहेत.
मात्र त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ते यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत. ‘शासन’ हा चित्रपट राजकारणावर आधारित आहे, प्रत्येकजण राजकारणाशी कसा जोडला गेला आहे, हे यामध्ये दाखवण्यात आले आहे. तुम्ही जिथे आहात, तिथून सुरूवात करा, असा सल्लाही अनासपुरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
‘शासन’ चित्रपटातील आपली भुमिका आक्रमक असून ती शोषणावर आधारित असल्याचे आदिती भागवत हिने सांगितले. पुढे जा, मात्र आपल्या मुळाशी जोडलेले रहा, तसेच चित्रपट सृष्टीतही अनेक संधी आहेत असा सल्ला आदिती हिने यावेळी दिला.



