पोस्टर मध्ये काय लिहिले आहे –
मोदीजी,हमारे बच्चोकी वैक्सीन विदेश क्यों भेज दिया
त्यावर टायटल लहिले आहे – Arrest me too. मुझे भी गिरफ़्तार करो।
नवी दिल्ली – जे पोस्टर लावले म्हणून २५ जणांना अटक झाली ते पोस्टर आता खुद्द कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शोषल मिडिया वर शेअर करत म्हटले आहे ,करा मला अटक ‘
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी रविवारी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन एक पोस्टर शेअर करत मोदी सरकारवर टोला लगावला आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘मलाही अटक करा’ असे लिहित ‘मोदीजी, आमच्या मुलांच्या लसी परदेशात का पाठवल्या?’ असा पोस्टर शेअर केला आहे.

कारण दिल्ली पोलिसांनी शनिवारी हे पोस्टर लावण्यावरुन 25 जणांना अटक केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही हेच पोस्टर शेअर करत याला आपले प्रोफाइल पिक्चर बनवले आहे.पंतप्रधान मोदी यांच्या नावे पोस्टर्स चिकटवण्यार्या 25 जणांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोस्टर्समध्ये लसीकरण मोहिमेचा उल्लेख करुन मोदी यांच्यावर टीका केल्याचे एका अधिकार्याने म्हटले आहे. कारण हे पोस्टर्स दिल्लीतील बर्याच भागात लावले होते. परंतु, या संबंधिची माहिती दिल्ली पोलिसांनी गुरुवारी समजल्याचे अधिकार्यांनी सांगितले.

