पुणे- महापालिकेच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेला तीन दिवसाचा शारदाबाई पवार कला महोत्सव सहकारनगर मधील वाळवेकर लाँस शेजारील मैदानात होणार आहे . आज येथे या महोत्सवाची जय्यत तयारी सुरु होती . १ ते ३ जानेवारी दरम्यान रोज सायंकाळी ७ ते १० या वेळेत होणाऱ्या या महोत्सवात १ जानेवारीला प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘गोष्ट राकट महाराष्ट्राची ‘ हा कार्यक्रम होईल ज्यामध्ये शिवराज्यभिषेक, रँडचा वध, विदेशी कपड्यांची होळी ,जाती निर्मूलनाचे कार्य , दाखविणाऱ्या महानाटयांचा समावेश आहे . ज्यामध्ये भार्गवी चिरमुले, गिरीजा जोशी, ऋतुजा जोशी, मधुरा दातार ,धवल चांदवडकर अशा अनेक कलावंतांचा समावेश आहे .
तर २ जानेवारीला मराठी चित्रपट सृष्टीची १०० वर्षे हा कार्यक्रम सादर होईल ज्याच्या नृत्यदिग्दर्शिका चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे आहेत . विक्रम गोखले, नेहा पेंडसे,लीला गांधी,सोनाली कुलकर्णी,सावनी रवींद्र श्वेता शिंदे,आदर्श शिंदे, नंदेश उमप, नियती राजवाडे ,भार्गवी चिरमुले श्रुती मराठे स्मिता तांबे आदी कलावंतांचा सहभाग असेल .३ जानेवारीला गायक महेश काळे यांचा सूर निरागस हो या कार्यक्रमाने या महोत्सवाचा समारोप होईल .
२ जानेवारीला या महोत्सवात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार , खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप आदी मान्यवरांचा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत .
या महोत्सावाबाबत स्थायी सामितीच्या माजी अध्यक्षा नगरसेविका अश्विनी कदम यांनी काय म्हटले आहे ते ऐका आणि पहा …

