पुणे- पत्रकारांवर होणारे हल्ले याविरोधात पत्रकार संरक्षण कायदा आणि ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन अशा पत्रकारांच्या मागण्या सोडविण्यासाठी आपण शासन आणि पत्रकारांच्या प्रतिनिधीच्या बैठका घडवून आणू आणि स्वतः अशा बैठकांना उपस्थित राहून पत्रकारांचे प्रश्न सोडवून घेवू असे अआश्वसन येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी सांगितले .
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या अॅमनोरा पार्क मधील क्लब हाऊसमधील पहिल्या जिल्हास्तरीय अधिवेशनात उद्घाटन समयी ते बोलत होते . परीषदेचे अध्यक्ष एस एम देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पुण्याचे महापौर आणि पिंपरीचे महापौर तसेच आमदार योगेश टिळेकर, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित ,बाप्पू गोरे , कृष्णकांत कोबल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पाहू-ऐकू यात नेमके शरद पवार काय म्हणाले ….