सीआयडी ,ईडी चा गैरवापर ;अनिल देशमुखांवरील आरोप पत्राचा घेतला समाचार,नवाब मालिकांना ,संजय राऊताना अडकविल्याचा केला आरोप -कसली चौकशी चालविली एवढ्या दिवस ? उपस्थित केला प्रश्न
नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुजरातमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना सोडून देण्याच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. “एकीकडे महिलांच्या सन्मानाविषयी बोलायचं आणि दोन दिवसांनी गुजरात सरकार एका महिलेवर बलात्कार करणाऱ्यांना सोडून देतं. हाच महिलांचा सन्मान आहे का?” असा प्रश्न शरद पवारांनी विचारला आहे. ते मंगळवारी (२३ ऑगस्ट) दिल्लीत ते बोलत होते.महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करून त्यांच्या वर केलेल्या आरोप् पत्रा बद्दल पवारांनी आक्षेप नोंदविले १० करोड चे आरोप पत्र ४ करोड वर आणि आता १ करोड १० लाखावर आल्याचे ते म्हणाले, आणि हि रक्कम शैक्षणिक निधी म्हणून घेतल्याचा उल्लेख देखील असल्याचे त्यांनी यावेळी संकेत दिले .नवाब मलिक यांच्याबद्दल ते म्हणाले ,नवाब मलिक ची एकच चूक होती ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते होते .संजय राऊत यांची हि एवढ्या दिवस कसली चौकशी सुरु आहे ? असाही सवाल त्यांनी केला .
शरद पवार म्हणाले, “सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं १५ ऑगस्टचं भाषण ऐकलं. त्यात ते महिलांविषयी खूप चांगलं बोलले, महिलांच्या सन्मानाविषयी बोलले. एकीकडे महिलांच्या सन्मानाविषयी बोलायचं आणि दोन दिवसांनी गुजरात सरकार एका महिलेवर बलात्कार करणाऱ्यांना सोडून देतं. बिल्किस बानोंवर कसे आणि किती अत्याचार झाले हे सर्वांना माहिती आहे.”
“हे प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयाने या प्रकरणातील दोषींना शिक्षा दिली. महिलांवर इतके अत्याचार केल्यानंतर गुजरातमधील सरकार या गुन्हेगारांना चांगले माणसं म्हणतं सोडून देतं. हा महिलांचा सन्मान आहे का? पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात देशाला महिलांविषयी जी दिशा दाखवली तो हाच रस्ता आहे का? यातून सरकार देशाला काय संदेश देत आहे?” असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.

