सायकलसफर करीत नववर्षाचे स्वागत

Date:

पुणे-शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी संचलित स्पोर्ट्स नर्सरीच्या बालचमुनीं सायकल सर्वांची या सायकल रॅलीच्या माध्यमातून नवीन वर्षाचे  स्वागत केले. या उपक्रमाचे संस्थेचे हे तिसरे वर्ष आहे. एकूण 205 सायकलस्वारांनी  सहभाग नोंदवला.

सायकल म्हणलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल, खेळकर हास्य तरळताना दिसते. कितीही मोठे झालो अगदी वातानुकुलीत  कार मधून फिरलो तरी सायकलची मजा कशातच नाही. घरात मुलं सायकल चालवण्यासारखं झालं की बाबा त्याला सायकल आणून देतात. आणि त्याला सायकल शिकवताना स्वतः कधी बालपणात हरवून जातात त्यांनाच कळत नाही. मग आमच्या वेळी आम्ही कशी सायकल शिकलो. स्वतःची सायकल नसली तरी मित्राची घेऊन, भाड्याने आणून, आईला चोरून अशा अनेक क्लुप्त्या वापरून सायकल शिकलो याचा पाढाच बाबा वाचत असतात. सायकल विषयी त्यांचे प्रेम कणभरही कमी झालेले नसते. तीच ऊर्जा, तोच जोम परत एकदा मुलाला सायकल घेताना असतो.जे बाबांचं तेच मुलाचं. सायकल आणण्याच्या आदल्या दिवशी तर तो झोपतच नाही सकाळ होण्याचा अवकाश की हा तयार झालेला असतो. मग बाबांची सगळी काम न सांगता होतात. अभ्यास वेळेत होतो. शाळेतून आल्यावर बूट, कपडे अगदी जागेवर जातात. आजीची सगळी काम न सांगता होतात. टीव्हीला तर हातच लावला जात नाही. जणूकाही घरात नवीन पाहुणाचं येणार असल्यासारखं वातावरण अगदी उत्साही असतं.
खरंच आपण कितीही मोठे झालो तरी सायकलसारखी मजा कशातच नाही. कितीही गाड्या बदलल्या तरी सायकलच्या सीटशी जोडलेली नाळ तोडू म्हणता तुटत नाही. सायकल चालवण्याचे फायदे सांगण्यापेक्षा सायकल चालवण्यातील आनंद जास्त मोठा असतो. हाच आनंद द्विगुणित करण्याचे आणि येणाऱ्या पिढीला आरोग्यदायी जीवनशैली शिकवण्याचे काम शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी आपल्या विविध उपक्रमातून करत असते.


नवीन वर्षाची आरोग्यदायी सुरुवात करण्यासाठी आणि मुलांमध्ये व्यायामाची सवय लागावी म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी संचलित स्पोर्ट्स नर्सरी द्वारे सायकल सजावट,प्रदर्शन आणि रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा संस्थेचे या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे.

एकूण 205 सायकलींनी सहभाग नोंदवला. छोट्या गटात (वय 2 ते 5 वर्षे)-114 सायकलींनी तर
मोठा गटात (6 ते 60 वर्षे)- 91 सायकलींनी सहभाग नोंदवलासकाळच्या रॅलीला नगरसेवक जयंत भावे आणि पुणे मनपा सायकल संघाच्या स्मिता पंढरी यांनी झेंडा दाखवला तर संध्याकाळच्या रॅलीला नगरसेवक दीपक पोटे आणि भाजपाचे कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष पुनीत जोशी यांनी झेंडा दाखवला.

यावेळी क्रीडाप्रेमी तात्या बालवडकर हे उपस्थित होते. त्यांनी सर्व सहभागी मुलांचा मेडल देऊन सन्मान केला.
या रॅलीचे आयोजन संस्था गेली तीन वर्षे सातत्याने करत आहे.
सायकल चालवा, आयुष्य वाढवा अशा घोषणा देत रॅलीने एरंडवणा-कर्वेनगर परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. तसेच सायकलींची सजावटही आकर्षणाचा भाग ठरली. चौका-चौकात परिसरातील नागरिकांना मुलांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. सायकल सजावटीचे परीक्षण पुणे मनपा सायकल संघाचे सायकलपटू सुरेश परदेशी, नरेंद्र साळुंके,विशाल भोसले, इंदिरा नॅशनल स्कुलच्या शिक्षिका शुभांगी बोधनकर यांनी केले. या रॅलीचे आयोजन संस्थेचे पदाधिकारी निलेश जोरी, चंद्रकांत पवार, राजेंद्र येडे, सुयश गोडबोले, मृदुला उपघडे, तुकाराम येडके, शंतनू खिलारे,राज तांबोळी, अनुराधा येडके यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...