पुणेकरांची आवडती सपना थाळी पुन्हा सेवेत सज्ज
पुणे : पुण्यात 70,80 व 90 च्या दशकातील सर्वांत लाडके थाळी रेस्टॉरंट सपना थाळी रेस्टॉरंट पुन्हा सेवेत सज्ज झाले आहे. सपना हॉटेल हे जंगली महाराज रस्त्यावर संभाजी पार्कजवळ स्थित असून सर्व पुणेकरांसाठी सोयीस्कर आहे. वैविध्यपूर्ण डिशेसचा अनुभव खवय्यांना येथे घेता येणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना सपना हॉटेलचे भागीदार दर्शन व राजेश रावळ म्हणाले की,70 लोकं एकाच वेळी भोजनाचा आनंद घेऊ शकतात,अशी ही प्रशस्त जागा आहे.येथे खवय्यांना थाळीमध्ये गुजराती तुअर दाल,दही वडा,उंधियो,खांडवी,पुरण पोळी,सपना की कढी,फुलका,गोबी मसाला,कचोरी,फ्रुट सॅलड,मेथी थेपला,जीरा पीस पुलाव,दुधी ना मुठ्या,छास,पापड यांसारख्या खादयपदार्थांचा आनंद घेता येणार आहे. सर्व प्रकारच्या ग्राहकांना सोयीस्कर वाटेल अशा थाळी उपलब्ध आहेत.यामध्ये ब्राँझ थाळी (सोमवार ते शनिवार) टेक अवे आणि डिलिव्हरीकरिता 195 रूपये,सिलव्हर थाळी (सोमवार ते शनिवार) टेक अवे व डाइन इन 275 रूपये,गोल्ड थाळी (सोमवार ते शनिवार) डाईन इन अनलिमिटेड 350 रूपये,प्लॅटिनम थाळी (रविवार व सार्वजनिक सुट्टी) डाईन इन अनलिमिटेड 415 रूपये,गोल्ड टिफिन (सोमवार ते शनिवार) टेक अवे आणि डिलिव्हरी 590 रूपये,प्लॅटिनम टिफिन (रविवार व सार्वजनिक सुट्टी) 800 रूपये उपलब्ध आहेत.
तीन दशके पुणेकरांनी सपना थाळी रेस्टॉरंटवर भरभरून प्रेम केले व आता ही तसाच प्रतिसाद आम्हाला मिळेल याची आम्हाला खात्री आहे.