Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सफाई कामगारांना भाजप सरकार न्याय देणार- शाम जाजू

Date:

पुणे-सफाई कामगारांच्या मागण्यासाठी सफाई कामगार मेळावा उत्साहात संपन्न झाला . पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे झालेल्या या मेळाव्याचे उदघाटन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून करण्यात आले . या सफाई कामगार मेळाव्याचे संयोजन  संयोजक सफाई कामगार नेते डॉ. अनुपम बेगी यांनी केले होते .

 यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू , सफाई कामगार नेते डॉ. अनुपम बेगी ,  भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष योगेश गोगावले , भाजप  राष्ट्रीय नेते लतिफ मगदूम , भाजप पुणे कॅण्टोन्मेट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष जयप्रकाश पुरोहित , महासचिव उमेश शिंदे , भारतीय मजदूर संघ अध्यक्ष दीपक कुलकर्णी ,योगेश पिंगळे ,  दलितमित्र नरोत्तम चव्हाण , भिकाचंद मेमजादे , घनश्याम सुसगोहेर , अरविंद भिंगानिया , भानुदास सोलापूरकर ,  अरविंद चव्हाण ,  राधेश्याम  पुरोहित , नारायण सारवान , अनिलबाबू चावरे , कैलाशकुमार , दिनेश नायकु , दिनेश मेमजादे , पुष्पक चव्हाण , अमित चव्हाण व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत .

  या  मेळाव्याचे संयोजक सफाई कामगार नेते डॉ. अनुपम बेगी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात  सफाई कामगारांच्या मागण्या  मांडल्या ,त्यामध्ये लाड पागे समितीची अंमलबजावणी तात्काळ करून त्याचे परिपत्रक शासनाने काढले पाहिजे , लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य तथा राष्ट्रीय सफाई आयोगाची स्थापना केली पाहिजे , सफाई कामगारांच्या आर्थिक उन्नतीसाठी महर्षी वाल्मिकी विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी , महाराष्ट्र राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार ( दलितमित्र ) पुरस्कार दिला जातो त्याच धर्तीवर भगवान महर्षी बाल्मिकी पुरस्कार राज्य सरकारने देण्यास सुरू करावा , मेहेतर बाल्मिकी रुखी समाज तसेच सफाई कामगारांच्या मुलांसाठी उच्च शिक्षणामध्ये शैक्षणिक सवलत देयूनं त्यांची फि माफ करण्यात यावी , सातवा वेतन आयोग लवकरात लवकर लागू करावा , केंद्र सरकारने सफाई कामगारांना टेक्निकल दर्जा देयून तिसरा दर्जा द्यावा , सफाई कामाच्या ठेक्यामध्ये सफाई कामगारांना कायम करण्यात येऊन सफाई कामगारांचे ठेके राज्य व केंद्र सरकारने बंद करावेत , सफाई कामगारांच्या सर्वागींण विकासासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने हायपावर कमिटी बनवावी . महाराष्ट्र राज्य सरकारने भगवान जाहरवीर गोगादेव जन्मोत्सव दिवशी भगवान जाहरवीर गोगादेवच्या शोभा यात्रेस रात्री १२ पर्यंत परवानगी देण्यात यावी , मंत्रालयसमोर भगवान बाल्मिकी चौक येथे भगवान महर्षी बाल्मिकी यांची मूर्ती बसविण्यात यावी . या मागण्या मांडण्यात आल्या

 यावेळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांनी सफाई कामगारांना मार्गदर्शन करताना सांगितले की , भाजप सरकार सफाई कामगाराना सुविधा देण्यात येईल , तसेच सफाई कामगार आयोगाची स्थापना देखील करण्याचे आश्वासन दिले . यासाठी लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जाईल . काँग्रेसने आतापर्यंत सफाई कामगारांना नारेबाजी करून फक्त आश्वासन दिले परंतु भाजप सरकार तसे करणार नाही . सफाई कामगारांची हाताने मैला साफ करण्याची पध्दत बंद करण्यात येईल . या समाजाची गोगानवमीच्या या उत्सवासाठी बारा वाजेपर्यंत उत्सव साजरा करण्यासाठी वेळ वाढवून देण्यात येईल . भाजप सरकारने सर्वसामान्य माणसाचे बँकेत खाते उघडले , दारिद्र्यरेषेखालील जनतेस गॅस मिळवून दिला . तसेच त्यांचा विमा देखील उतरविला , ही कामे मोदी सरकारने केली आहेत . त्यामुळे सफाई कामगारांना मोदी सरकार न्याय देणार . कारण मोदी सरकारवर जनतेचा विश्वास आहे .

या सफाई कामगारांच्या मेळाव्यामध्ये  सफाई कामगार आपल्या  न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते . या मेळाव्याचे प्रास्तविक व उपस्थितांचे  स्वागत  सफाई कामगार नेते डॉ. अनुपम बेगी यांनी केले तर सूत्रसंचालन उमेश शिंदे व कुमार पाटोळे यांनी केले तर आभार भाजप पुणे कॅण्टोन्मेट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष जयप्रकाश पुरोहित यांनी केले . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वैयक्तिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर हक्क वापरा – ॲड. अक्षता नेटके

एसबीपीआयएम मध्ये 'निर्भया जनजागृती' सत्र संपन्न पिंपरी, पुणे (दि. ०५...

विमा क्लेमच्या रकमेसाठी वडिलांनी घडवून आणली मुलाची हत्या

खुनासाठी दिली साडेतीन लाखांची सुपारीमुरादाबाद-विमा दाव्याच्या लोभापायी एका वडिलांनी...

4 दिवसांत 1200+ उड्डाणे रद्द, लुट अन हालापेष्टांनी प्रवासी हैराण…

नागरी हवाई उड्डाण मंत्र्यांनी केवळ व्यक्त केली नाराजी, म्हणाले-...