कुणाल टिळक नावालाच शैलेश टिळकांचे प्राधान्य..

Date:

आज ११ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडे उमेदवारी आणि निवडणूक संदर्भात बैठक

पुणे: कसबा विधानसभा मतदार संघातून टिळक कुटुंब येथून आपली राजकीय लढाई लढण्यासाठी उत्सुक आहेतच. त्यात पित्याने आता मुलासाठी आग्रह सुरू केल्याचे वृत्त समजते आहे. त्यामुळे टिळक आणि बापट अशा दोन इच्छुकांमध्ये भाजपात प्रमुख रस्सीखेच असल्याचे समजते आहे. भाजप खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांना मतदार संघातून सर्वसमावेशक अशी मोठी पसंती आहे.. याशिवाय कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, , माजी सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे, माजी नगरसेवक अशोक येनपुरे यांचीही नाव चर्चेत आहेत. दरम्यान आज कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बोलावली भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक बोलाविली असून हि बैठक सकाळी ११ वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी होणार आहे आणि सर्व प्रमुख नेते राहणार बैठकीस उपस्थित राहनार आहेत.

27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या पोटनिवडणूकीसाठी अनेकांनी कंबर कसली आहे. परंपरागत भाजपचा असलेला कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या जागेवर उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा आहे. यात त्यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवाय मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळकांनी देखील घरातच उमेदवारी देण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. शैलेश टिळक हे कायम मुक्ता टिळक यांची सावली बनून वावरले.

कुणाल टिळक हा आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा आहे. त्याच्याकडे भाजप युवा मोर्चाचा उपाध्यक्ष आहे. युनिव्हर्सिटी ऑफ स्टरॅथक्लायेद, इंग्लंडचा विद्यार्थी राजदूत म्हणून त्यांनी काम केलं आहे. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय मासिक संपादकीय समिती सदस्य म्हणून तो कार्यरत आहे.कुणाल याचं शिक्षण पुण्यातील एस पी महाविद्यालयातून झालं आहे. त्यानंतर त्याने पुणे विद्यापीठातून बीबीएची डिग्री घेतली आहे. त्याशिवाय त्यांनी एल. एल. एम आंतरराष्ट्रीय संबंध, कायदे आणि सुरक्षा युनिव्हर्सिटी ऑफ स्टरॅथक्लायेद, इंग्लंडमधून पूर्ण केलं आहे. मागील 20 वर्ष मुक्ता टिळकांनी महिला लोकप्रतिनिधी म्हणून नावलौकिक मिळवला. कॅन्सर सारख्या आजारानं ग्रासलं असतानादेखील त्या कार्यरत होत्या. मागील दोन वर्षात त्यांची प्रकृती जास्तीच खालावली होती. त्यामुळे आईच्या कामाचा भार हलका करण्यासाठी कुणाल यांची प्रयत्न केले. मतदार संघाचा अभ्यास केला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आता त्याचेच राजकारणात करिअर करायचे, घडवायचे असा टिळक कुटुंबाचा प्रयत्न सुरू झाला आहे.


SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...