किरीट सोमैय्या हल्ल्याच्या तक्रारीचे प्रकरण : आज कोर्टात जामीन होण्याची शक्यता
पुणे : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेच्या आवारात झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी गुन्हा दाखल असलेले शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह शिवसेनेचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते आज सकाळी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत.या प्रकरणात मोरे, पदाधिकारी चंदन साळुंके, किरण साळी, सूरज लोखंडे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनी गवते यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रशांत लाटे यांनी या संदर्भात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात सोमवारी सनी गवते (वय ३२, रा. नाना पेठ) याला अटक करण्यात आली आहे. धक्काबुक्की झाल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील तक्रार केली आहे. गुन्हा दाखल झालेल्या अन्य शिवसैनिकांचा पोलिस शोध घेत होते. त्यामुळे शहर प्रमुखांसह अनेक शिवसैनिक स्वतःहून पोलिसांत हजर झाले आहेत. या सर्वांवर काय कारवाई होणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. सनी गवते यास कालच पोलिसांनी अटक केली होती .
दरम्यान भाजपचे शिष्टमंडळ आज पोलीस आयुक्तांना भेटणार आहे आणि त्यानंतर पुन्हा या प्रकरणी आक्रमक भूमिका भेणार आहे . असे भाजपच्या वतीने सांगण्यात आले आहे.


