पुणे : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार सोनिया गांधी व काँग्रेस नेते माजी आमदार मोहन जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहांतर्गत ही फुटबॉल स्पर्धा ५ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२१ या कालावधीत होणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव प्रदीप परदेशी यांनी दिली.
प्रदीप परदेशी म्हणाले, “पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेशी संलग्नित ३२ संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. वानवडी येथील मथुरावाला फुटबॉल स्टेडियमवर हे सामने खेळवले जातील. या फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (दि. ५) राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, शहराध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते होणार आहे. १२ डिसेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाणार असून, विजेत्या व उपविजेत्या संघाला पारितोषिक देण्यात येणार आहे.”

