महापौरांवर गंभीर आरोप ?राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षांनी उपस्थित केला प्रश्न

Date:

पुणे : पुण्यनगरीचे प्रथम नागरिक अशा प्रतिष्ठेचे पद असलेल्या महापौरांचाही गुन्हेगारीत समावेश आहे काय ? असा प्रश्न उपस्थित करत पुणेकर म्हणून नक्कीच शरमेने मान खाली घालायला लावणारी घटना आहे. ज्या गुंड सदा ढावरेच्या माध्यमातून ही संघटित गुन्हेगारी करण्यात येत होती, त्या सदा ढावरेला गेल्या आठ दिवसांपासून कुणाकुणाचे फोन आले होते, यात आणखी कोण सहभागी आहे, हे तपासण्यासाठी ढावरेचा ‘सीडीआर’ काढण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी पोलिस आयुक्तांकडे करण्यात येणार आहे.अशी माहिती आज येथे पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली

प्रशांत जगताप म्हणाले,’भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काहीजणांचा भाजप प्रवेश करण्याचा प्रयत्न बुधवारी फसला. परंतु, सत्य फार काळ लपून राहात नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे दोन कारनामे नव्याने उघड झाले आहेत. माझ्या वानवडी प्रभागातील भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी मारहाण केल्याची व धमकावल्याची तक्रार एका ठेकेदाराने केली आहे. यात अधिक चौकशी केली असता, हे प्रकरण तेवढ्यापुरतेच मर्यादित नसून,या प्रकरणाचा थेट संबंध महापौरांपर्यंत येऊन ठेपला आहे. परंतु, महापौरपद हे सन्माननीय पद असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम्ही करणार नाही. मात्र, भाजपचे शहराध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, सभागृहनेत्यांनी या प्रकरणी खुलासा करावा, अशी मागणी आम्ही करीत आहोत. तसेच, ही घटना गंभीर असल्याने गेल्या १५ दिवसांपासून सदा ढावरेला कुणाकुणाचे फोन येत होते, हे तपासण्यासाठी ढावरेचा ‘सीडीआर’ काढण्यात यावा, अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे करणार आहोत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...