पुणे, दि.28 फेब्रुवारी 2021: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली आयोजित एमएसएलटीए अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरिज 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात नील केळकर याने तर, मुलींच्या गटात श्रावणी देशमुख या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत पुण्याच्या बिगरमानांकीत नील केळकर याने साताऱ्याच्या आठव्या मानांकित वरद पोळला 9-6 असा पराभवाचा धक्का देत आगेकूच केली. औरंगाबादच्या अव्वल मानांकित नीरज रिंगणगावकर याने आपली विजयी मालिका कायम ठेवत अवनीश चाफळेचा 9-7 असा पराभव केला. काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या अर्चित धूत याने पुण्याच्या क्रिशांक जोशीचा टायब्रेकमध्ये 9-8(4) असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. मुलींच्या गटात अव्वल मानांकितप्रिशा शिंदे हिने सहाव्या मानांकित सलोनी परीदाचे आव्हान 9-0असे सहज मोडीत काढले. बिगरमानांकीत पुण्याच्या श्रावणी देशमुख हिने सातव्या मानांकित मेहक कपूरचा 9-2 असा पराभव करून आणखी एका अनपेक्षित निकालाची नोंद केली. चौथ्या मानांकित सेरेना रॉड्रिक्स हिने मृणाल शेळकेवर 9-0असा विजय मिळवला. श्रेया पठारे हिने मेहा पाटीलला 9-3 असे नमविले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुले: उपांत्यपूर्व फेरी:नीरज रिंगणगावकर(1) वि.वि.अवनीश चाफळे 9-7;नील केळकर वि.वि. वरद पोळ(8) 9-6;अर्जुन किर्तने वि.वि.दक्ष पाटील 9-3;अर्चित धूत वि.वि.क्रिशांक जोशी 9-8(4);
मुली: प्रिशा शिंदे(1)वि.वि.सलोनी परीदा(6)9-0; सेरेना रॉड्रिक्स(4)वि.वि.मृणाल शेळके 9-0;श्रेया पठारे वि.वि.मेहा पाटील 9-3;
श्रावणी देशमुख वि.वि.मेहक कपूर(7)9-2.

