14वर्षांखालील सुपर सिरिज 2022 स्पर्धेत साईइती वराडकर, श्रेया पठारे यांचा सनसनाटी विजय

Date:

पुणे, 26 एप्रिल 2022: बाऊन्स टेनिस अकादमी व सनी वर्ल्ड आणि कासट सारीज रविवार पेठ पुरस्कृत यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या बाऊन्स टेनिस अकादमी -एमएसएलटीए एआयटीए 14वर्षांखालील सुपर सिरिज 2022 स्पर्धेत मुलींच्या गटात साईइती वराडकर, श्रेया पठारे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली.   
सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट, पाषाण सुस रोड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत संघर्षपूर्ण लढतीत महाराष्ट्राच्या बिगरमानांकीत साईइती वराडकर हिने आठव्या मानांकित गुजरातच्या पिया मिस्त्रीचा 6-4, 3-6, 7-5 असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या श्रेया पठारेने सातव्या मानांकित आपलीच राज्य सहकारी रिवा मेहताचे आव्हान 6-0, 6-2 असे मोडीत काढले. पुण्याच्या मृणाल शेळकेने सृष्टी सूर्यवंशीचा 6-1, 6-2 असा तर, पाचव्या मानांकित सिया प्रसादेने ह्रितिका कापलेचा 6-0, 6-3 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. 
मुलांच्या गटात नांदेडच्या अव्वल मानांकित शिवतेज शिरफ़ुले याने अयान शेट्टीचे आव्हान 6-2, 6-2 असे संपुष्टात आणले. पाचव्या मानांकित अवनीश चाफळे याने माहिजीत प्रधानवर 6-0, 7-5 असा विजय मिळवला. 
निकाल: मुख्य ड्रॉ(दुसरी फेरी): मुली:देवांशी प्रभुदेसाई(महा)[1] वि.वि.व्रण्डिका राजपूत(महा)6-2, 6-4; साईइती वराडकर(महा)वि.वि.पिया मिस्त्री(गुजरात)[8]6-4, 3-6, 7-5;  
मृणाल शेळके(महा)वि.वि.सृष्टी सूर्यवंशी(महा)6-1, 6-2;  श्रेया पठारे(महा)वि.वि.रिवा मेहता(महा)[7] 6-0, 6-2; सिया प्रसादे(महा)[5]वि.वि.ह्रितिका कापले(महा) 6-0, 6-3;  मेहक कपूर(महा)[3]वि.वि.देवाश्री महाडेश्वर(महा)6-2, 6-1;  रिद्धी शिंदे(महा)[6] वि.वि.स्वनिका रॉय(महा)2-6, 6-3, 6-3; जीडी मेघना(कर्नाटक)[2] वि.वि.सेरेना रॉड्रिक्स(महा)6-0, 6-3;
मुले: शिवतेज शिरफ़ुले(महा)[1] वि.वि.अयान शेट्टी(महा)6-2, 6-2;अवनीश चाफळे(महा)[5] वि.वि.माहिजीत प्रधान(महा)6-0, 7-5; विश्वजीत सणस(महा)[3] वि.वि.अर्जुन वेल्लूरी(महा)6-1, 6-3; तेज ओक(महा)वि.वि.एम श्रेयंथ(कर्नाटक)6-3, 6-4; नील केळकर(महा)वि.वि.सूर्या काकडे(महा)6-4, 6-4; सक्षम भन्साळी(महा)वि.वि. सार्थक गायकवाड(महा) 6-1, 6-3;दक्ष पाटील(महा)वि.वि.चन्नामल यले(कर्नाटक)6-4, 6-4; आरुष भल्ला(महा)वि.वि.वरद पोळ(महा) 6-4, 6-3.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...