पुणे, 19 एप्रिल 2022: बाऊन्स टेनिस अकादमी व सनी वर्ल्ड यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सनी स्पोर्ट्स किंगडम-एमएसएलटीए एआयटीए 16वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत मुलांच्या गटात पुण्याच्या अवनीश चाफळे याने सातव्या मानांकित नील जोगळेकरचा 6-2, 6-0 असा पराभव करुन सनसनाटी विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट, पाषाण सुस रोड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित लक्ष्य गुजराथी याने ओमकार शिंदेचा 7-5, 6-4 असा तर, चौथ्या मानांकित गुजरातच्या आकांश सुब्रमणियमने महाराष्ट्राच्या अमोघ दामलेचा 6-0, 6-1 असा सहज पराभव करून आगेकूच केली. अभिराम निलाखे याने सनत कढलेला 6-1, 6-4 असे पराभूत केले. दुसऱ्या मानांकित गुजरातच्या अक्षय सुब्रमणियम याने महाराष्ट्राच्या कौशिक कचरेचे आव्हान 6-2, 6-1 असे संपुष्ठात आणले. सहाव्या मानांकित विवान कारंडे याने अर्जुन किर्तनेचा 6-3, 6-3 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
निकाल: मुख्य ड्रॉ(उप-उपांत्यपूर्व फेरी): मुले: लक्ष्य गुजराथी(महा)[1] वि.वि.ओमकार शिंदे(महा)7-5, 6-4; अवनीश चाफळे(महा)वि.वि.नील जोगळेकर(महा)[7] 6-2, 6-0; आकांश सुब्रमणियम(गुजरात)[4] वि.वि.अमोघ दामले(महा)6-0, 6-1; तेज ओक(महा)वि.वि.अयान शेट्टी(महा) 3-0 सामना सोडून दिला;विवान कारंडे(महा)[6]वि.वि.अर्जुन किर्तने(महा) 6-3, 6-3;स्वराज ढमढेरे(महा)वि.वि.बलवीर सिंग 6-3, 6-4; अभिराम निलाखे(महा)वि.वि. सनत कढले(महा) 6-1, 6-4;अक्षय सुब्रमणियम(गुजरात)[2]वि.वि.कौशिक कचरे(महा)6-2, 6-1;
मुली:
श्रेया पठारे(महा)वि.वि.आदिती रॉय(महा)6-1, 6-2;
मेहक कपूर(महा)[6]वि.वि.अर्शिन सप्पल(दिल्ली)6-1, 3-0सामना सोडून दिला; प्रिशा शिंदे(महा)[4] वि.वि.मृणाल शेळके(महा)6-0, 6-0;देवांशी प्रभुदेसाई(महा)[8]वि.वि.अभिलिप्सा मल्लिक(महा)6-4, 6-1;

