जेष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांना नादब्रम्ह संजीवनी पुरस्काराने सन्मानित

Date:

पुणे- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नगरसेवक  दीपक मानकर यांना नादब्रम्ह संस्थे तर्फे ” नादब्रम्ह संजीवनी ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रवींद्र वंजारवाडकर संघचालक, पुणे महानगर यांच्या हस्ते स्मृतिचिन्न देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी डॉ. गौतम छाजेड व जावेद खान यांना ” नादब्रम्ह ” पुरस्कार तर अशोक तुपे यांना उत्कृष्ट गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  तसेच चंद्रकांत सणस (गिरीजा कट्टा) अजय खेडेकर (नगरसेवक ) राजाभाऊ भिलारे (समाज सेवक) धीरज घाटे (नगरसेवक) शिरीष मोहिते (समाजसेवक) आनंद सागरे (समाजसेवक) निरंजन दाभेकर (भरत मित्र मंडळ) वसंत मोरे (नगरसेवक) सचिन जामगे (वंदेमातरम संघटना) सारंग सराफ (समाजसेवक) समीर धनकवडे (समाजसेवक) ऋषिकेश बालगुडे (समाजसेवक) छाया गायकवाड (नायडू हॉस्पिटल नर्स) यांना बाळासाहेब दाबेकर,प्रवीण परदेशी,गणेश घुले, अण्णा थोरात, दत्ता सागरे ,पराग ठाकूर यांच्या हस्ते” संजीवनी नादब्रम्ह” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या वेळी बोलताना  नगरसेवक दीपक मानकर म्हणाले कि कोरोनाच्या काळात या व्यासपीठावर बसलेल्या सर्वांनी या समाजाला, या पुण्याला, पुणेकरांना संजीवनी देण्याचे कार्य केले आहे. दिवस रात्र सर्वांनी स्वतःला झोकून, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी  नाद करून गरजू राष्ट्र बंधू, भगिनींना जगण्यासाठी नवी संजीवनी दिली, सर्वांचे कार्य उल्लेखनीय आहे पण, जावेद खान यांनी कोरोना च्या काळात जे कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले अशा सातशे ते आठशे राष्ट्रबांधवांचे अंत्यविधी केले. कोणतीही जात, धर्म,पंथ न बघता आपण भारतीय आहोत या भावनेने सगळ्यांचे अंत्यविधी केले हे फार मोठे कार्य आहे. त्यांचा हा मोठे पणा आहे. तसेच त्यांना पुरस्काररुपी मिळालेले अकरा हजार रुपये,त्यांनी मोठ्या मनाने अयोध्येतील राम  मंदिरासाठी  रवींद्र वंजारवाडकर याच्या कडे सुपूर्त केले. प्रत्येकाने आपण समाजाला काही देणे लागतो, आपले कर्तव्य समजून समाजासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन समाजसेवी कार्य केले पाहिजे असे मानकर म्हणाले. नादब्रम्ह चे संस्थापक अतुल बेहेरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...